गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका


गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा जबर फटका बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. यावेळी भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद आहे.


पुराचा तडाखा बसलेल्या मराठवाड्याला राज्य शासनाने २२१५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. यंदाच्या वर्षी भामरागड तालुक्याला पाचव्यांदा पुराचा फटका बसला आहे. भामरागड तालुक्यातील १०५ गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (NH-130D) पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी ठप्प आहे.


पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहू लागली आणि रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर पाणी चढले. यामुळे, आल्लापल्ली–भामरागड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महसूल व पोलीस विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवला आहे. ‎वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्या तसेच खासगी वाहने पुलाच्या दोन्ही बाजूला अडकून पडली आहेत. नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांची गैरसोय झाली आहे.


Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने