वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना


वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. गरबा खेळून झाल्यानंतर अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ४६ वर्षीय फाल्गुनी राजेश शहा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून उत्सवी वातावरणात दु:खाची छाया पसरली आहे.


ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भव्य गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक रहिवासी असलेल्या फाल्गुनी शहा या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मात्र, काही वेळ गरबा खेळल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच त्या जमिनीवर कोसळल्या.


स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा तीव्र झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील रहिवाशांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.


नवरात्रोत्सवाच्या उत्सवी वातावरणात घडलेली ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली आहे. आनंदाच्या क्षणात मृत्यूने अचानक दार ठोठावल्याने उत्सवामध्ये शोकाची सावली पसरली आहे..

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण