आशिया कप ट्रॉफी वादावर बीसीसीआय आक्रमक! विजेत्या संघाला ट्रॉफी का दिली नाही? नक्वींना राजीव शुक्लांचा थेट सवाल

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावले असले तरी, पारितोषिक वितरण समारंभातील नाट्यमय घडामोडींमुळे ट्रॉफीचा वाद चांगलाच चिघळला आहे. भारतीय संघाने एशियन क्रिकेट काऊन्सिलचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी  यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर नक्वी हे ट्रॉफी घेऊन मैदानातून निघून गेले होते.


या संपूर्ण प्रकरणावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आक्रमक झाले असून, मंगळवारी दुबईत झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला.



राजीव शुक्लांचा नक्वी यांना थेट सवाल


बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करत असलेले उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या बैठकीत मोहसीन नक्वी यांना थेट प्रश्न विचारला. "विजेत्या संघाला ट्रॉफी का सोपवण्यात आली नाही? ही एसीसीची ट्रॉफी आहे, कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. ती औपचारिक पद्धतीने विजेत्या संघाला दिली जावी लागते," असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले.



मोहसीन नक्वींचे स्पष्टीकरण


यावेळी मोहसीन नक्वी यांनी बाजू मांडताना सांगितले की, "मी तेथे एका कार्टूनसारखा उभा होतो. भारतीय संघ माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, अशी कोणतीही लेखी सूचना एसीसीला देण्यात आली नव्हती." तथापि, भारतीय प्रतिनिधींनी कठोर भूमिका घेतल्यावर नक्वी यांनी सांगितले की, या विषयावर इतर व्यासपीठावर चर्चा होईल, या बैठकीत नाही.



बीसीसीआयची मागणी


बीसीसीआयने या बैठकीत स्पष्ट मागणी केली आहे की, एशिया कपची ट्रॉफी त्वरित भारतीय संघाला सोपवण्यात यावी. ट्रॉफी न मिळाल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचा आनंद ट्रॉफीसह साजरा करता आला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून