दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी


caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव घेतली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गुरुवारी दुपारपर्यंत १०५ तर नवरात्री काळात ४ हजार २२६ दुचाकी चारचाकी वाहनांची नोंद झाली. शुभ दिन म्हणून मानल्या जाणाऱ्या या दिवसात वाहन विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र यंदाही दिसून आले. सकाळपासूनच शहरातील विविध वाहन वितरकांच्या दुकानात वाहन खरेदी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. नवीन गाडी घेऊन नागरिक मुहूर्त साधण्यासाठी येत होते. अनेक वाहन वितरकांनी त्यासाठी विशेष काऊंटर, वाहन ताब्यात देण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि संगणकीय नोंदणीसाठी वेगळी सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अर्जदारांना कुठल्याही अडचणीशिवाय सेवा मिळाली.


काही शोरूमसमोर सजवलेल्या नव्या गाड्यांची रांग लागली होती. ग्राहकांनी आपल्या कुटुंबियांसोबत गाडी खरेदी करून ती देवळात नेऊन तिची पूजा केली. शासनाच्या वाहन नोंदणीबाबतच्या नियमानुसार, वाहन वितरकाने नोंदणी केल्यावर वाहनास त्या नोंदणी क्रमांकाची


हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) लावूनच वाहन मालकाच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश वाहन मालकांनी १-२ आठवड्यापूर्वीच वाहन बुक करून त्या वाहनाची डिलीवरी आज घेतली. त्यामध्ये विशेष वाहन क्रमांक आरक्षित करणाऱ्या वाहन मालकांची संख्या जास्त आहे.


दसरा गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मंदीचे वातावरण असतानाही नवरात्री, आणि दिवाळीचा सण हा नेहमीच ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हंगामी पर्वणी ठरतो. यंदाही ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन खरेदीला मोठा प्रतिसादeler दिला. दुचाकी वाहनांना कायमच मागणी असते, मात्र यंदा चारचाकी गाड्यांमध्येही वाढलेली नोंदणी पाहायला मिळाली.


आरटीओ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नवरात्री आणि दसऱ्याच्या एका दिवसात वाहनांची नोंदणी होणं ही लक्षणीय वाढ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आकडा अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन विक्रेते आणि आरटीओ प्रशासन यांच्या मते, सणासुदीच्या काळात आणखी वाहन विक्री वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः दिवाळीपर्यंत विक्रीचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.


२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर काळात ठाणे आरटीओमध्ये झालेली वाहनाची नोंदणी


मोटर सायकल २ हजार ४८२


चार चाकी (कार) १ हजार ८


इतर ७३६


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी