नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा


नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता दररोज दोन वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ पासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नाशिक ते दिल्ली विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून,औद्योगिक, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याने नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डयाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी १२ जुलै २०२५ रोजी पत्रव्यवहार करत ही विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने दि.१६ सप्टेंबरपासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली. १८० आसनांचे विमान असून उद्योजक आणि व्यावसायिकांना ही विमानसेवा लाभदायी ठरेल. एका दिवसात दिल्लीतील कामे आटोपल्यानंतर नाशिकला परत येणे शक्य होईल. तसेच नाशकात अनेक पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी या कंपन्यांना ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ कोटींपेक्षा अधिक भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. कुंभमेळ्यासाठी उत्तर भारतातून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांसाठी या विमानसेवेचा चांगलाच लाभ होईल. दरम्यान, इतर मार्गांवरही विमानसेवा सुरु होणार आहेत.सध्या नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद या शहरांमध्ये जाण्यासाठी नाशिकहून विमानसेवा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली होती. आता इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दि. २८ ऑक्टोबरपासून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी नाशिक-इंदूर-जयपूर तसेच नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे.


विमानतळ सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न


नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नाशिकचे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्याबरोबरच जास्तीतजास्त शहरांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री


नाशिकची अर्थव्यवस्था बळकट होईल


या सुविधेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल आणि व्यवसाय, पर्यटन वाढण्याबरोबरच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होईल.यामुळे रोजगार निर्मितीतही भर पडेल आणि नाशिकची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. - मनीष रावल, उद्योजक ,उपाध्यक्ष निमा, विमान वाहतूक समिती अध्यक्ष, एमएसीसीआयए महाराष्ट्र आणि आयमा



Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण