अकोले येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.


अकोले येथे सध्या ‍दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तरची दोन न्यायालये कार्यरत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अकोले येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे. या न्यायालयासाठी २१ नियमित पदे मंजूर करण्यात आले आहेत व चार पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वेतन व वेतनेत्तर, तसेच अन्य खर्चासाठी २ कोटी ७९ लाख ३५ हजार ९३४ रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या पाणी चळवळीचा आधार हरपला : पद्मश्री डॉ. पोपटराव पवार

हिवरेबाजारच्या पाणी नियोजनाबाबत अतिशय आत्मीयतेने बोलणारे आणि महाराष्ट्रातील दुष्काळ व आत्महत्यांच्या

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या जेवणाच्या पंगतीवर FDAचा छापा, केटररकडे परवानाच नाही

अहिल्यानगर (प्रतिनिधी): जिल्हा बँकेच्या सोमवारी झालेल्या सभेनंतर केशर गुलाब मंगल कार्यालयात झालेल्या

Bhingar Clashes : भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा! पोलिसांच्या लाठीचार्ज प्रकरणात अधीक्षकाचे स्पष्टीकरण

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उधळल्यामुळे तणाव निर्माण

Beef Seizure : पोलिसांच्या छाप्यात साडेपाच लाखांचे गोमांस जप्त तोफखाना पोलिसांची कोठला भागात कारवाई; दोन आरोपी ताब्यात, मुख्य फरार 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन

Amruta Fadnavis : सणासुदीचा विचार करून माझे भाऊ योग्य तेच करतील; अमृता फडणवीस यांना जरांगेंबद्दल विश्वास

अहिल्यानगर प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून, राज्य सरकार यावर गांभीर्याने काम करत आहे.

Dharmavir Fort : धर्मवीर गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा, आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

Dharmavir Fort : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक