Ahilyanagar : गुरुनानक देवजींच्या 557 व्या प्रकाश गुरुपुरबचा भक्तिमय सोहळा

शीख धर्माचे प्रथमपातशाही धन धन श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या ५५७ व्या प्रकाश गुरुपुरबचा सोहळा येथील ऐतिहासिक गुरुद्वारा भाईदया सिंगजी, गोविंदपुरा येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) - शीख धर्माचे प्रथमपातशाही धन धन श्री गुरुनानक देवजी महाराज यांच्या ५५७ व्या प्रकाश गुरुपुरबचा सोहळा येथील ऐतिहासिक गुरुद्वारा भाईदया सिंगजी, गोविंदपुरा येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. गुरुबाणीचे मधुर स्वर, ‘वाहेगुरु, वाहेगुरु, धन गुरु नानक’चा जयघोष, अखंडपाठ साहिब, कीर्तन दरबार आणिगुरू का लंगर अशा विविध धार्मिक व सेवाभावी उपक्रमांनी संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्याला अहिल्यानगरसह परिसरातील शीख समाजबांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रकाश गुरुपुरबच्या निमित्ताने १७ ते २१ नोव्हेंबर  या कालावधीत शहरातील विविध भागांतून दररोज सकाळी प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने संगत सहभागी झाली होती. गुरुबाणीचे गायन आणि ‘वाहेगुरु, वाहेगुरु, धन गुरु नानक’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या या प्रभातफेऱ्यांमधून गुरुनानक देवजी यांच्या विचारांचा आणि शिकवणुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.


प्रकाश गुरुपुरबनिमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी गुरुद्वारा भाई दया सिंगजी, गोविंदपुरा येथे भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी शीख समाजबांधवांना गुरुनानक देवजी यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, गुरुद्वारा समितीचेव शीख समाजाचे अध्यक्ष बलदेवसिंग वाही, नगरसेवक मोहित पंजाबी, जितू गंभीर, संजय चोपडा, बाली बांगरे, प्रा. माणिक विधाते, बाळासाहेब बारस्कर आदी उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, गुरुनानक देवजीयांनी समाजातील वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांनी लंगरची मुहूर्तमेढ रोवून आपल्याकडे असलेले गरजूंना देण्याची शिकवण दिली. फक्त पैसा देणे म्हणजे सेवा नसून, पैसा नसताना देखील श्रमदानातून सेवा करण्याची शिकवण देखील त्यांनी दिली. त्यांचे अमूल्य शिकवण आजहीसमाजाला प्रेरक असून, ते आत्मसात करुन जीवनात पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.






गुरुद्वारा साहिब येथे संगतांच्या सहभागातून सांझाअखंडपाठ साहिबचे आयोजन करण्यात आले होते. या अखंडपाठ साहिबचा आरंभ २० नोव्हेंबर रोजी झाला, तर २२ नोव्हेंबर रोजी भोग साहिब झाला. यानिमित्त आयोजित कीर्तन दरबारात प्रसिद्ध कीर्तन जथा भाई मनराज सिंग जी (मार्कंडेवाले) तसेच हजुरी रागी भाई अमृत सिंग जी यांनी आपल्या मधुर गुरबाणी कीर्तनाने संगतांना निहालकेले. त्यांच्या भक्तिमय कीर्तन सेवेमुळे संपूर्ण गुरुद्वारा परिसर भक्तिरसात रंगून गेला. प्रकाश गुरुपुरब सोहळ्यादरम्यान समाजातील उल्लेखनीय कार्य आणि योगदानाबद्दल श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट, श्रीराम मंदिर, नवी पेठ यांना पंजाबी परिवाराच्या वतीने ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थेचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला.

Comments
Add Comment

IFFI 2026 : इफ्फीमध्ये एन. डी. स्टुडिओच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांकडून भेट

गोवा : गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट

काही वेगळे नाही...! झंझावाती द्विशतकी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने अशा भावना मांडल्या

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईने जिंकला

'आदि अनंत' मधून आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; इफ्फीमध्ये झाली चर्चा

गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित

FDA Action : पुण्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकलचे उत्पादन परवाने पुन्हा रद्द; परवानगीशिवाय 9 औषधांची निर्मिती केल्याचे उघड

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीवर अन्न व औषध

Philately quiz : 'विकास आणि वारसा' थीमवर रंगली फिलाटेली प्रश्नमंजुषा; विदर्भातील २० संघांचा सहभाग, विजेता संघ परिमंडळ स्तरावर झळकणार

नागपूर : तरुण पिढीमध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) गोडी निर्माण व्हावी आणि या माध्यमातून देशाचा गौरवशाली

अक्षयच्या कामाची शिस्त आणि दीपिकाचा हक्क! करण जोहरने मांडली फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या तासांवर भूमिका

'कॉफी विद करण' शोच्या नवव्या सीझनच्या येत्या भागात अभिनेते अक्षय कुमार आणि रवि किशन उपस्थित राहणार आहेत. या