अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने सांगितला 'तो' भयानक किस्सा...

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरला आपण सर्वच ओळखतो. सोशल मीडियावर तिचे हजारो चाहते असून आपले ग्लॅमरस फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.


हास्यजत्रेनंतर तिने मराठी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली नुकताच तिचा दशावतार हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यात तिने वंदू ही भूमिका साकारली होती. दशावतार निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपले काही अनुभव प्रेक्षकांना सांगितले. त्यातच तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या अविस्मरणीय अशा एका भयानक प्रसंगाबद्दल सांगितलं. यावेळी तिने 'जर उपचार मिळाले नसते तर मी संपले असते असंही म्हटलं.


पुण्याहून साताऱ्याकडे प्रवास करताना प्रियदर्शिनी इंदलकर आणि तिच्या आईचा भीषण अपघात झाला . वाळुंज गावाजवळ त्यांच्या गाडीने १५० किमी वेगात दुभाजकाला जोरदार धडक दिली . त्या वेळी प्रियदर्शिनी मागच्या सीटवर आडवी झोपलेली होती. धडकेच्या वेळी ती मधल्या पॅसेजमध्ये पडली आणि तिथल्या बंपमुळे तिच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. या धडकेत तिची स्प्लीन तुटली आणि आतून मोठा रक्तस्त्राव झाला.


सुरुवातीला प्रियदर्शिनीला फक्त हात आणि खांद्यास मार लागल्याचं दिसत होतं, त्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्या गंभीर अवस्थेत असलेल्या आईकडे होतं. अपघात झाला तेव्हा आईला कदाचित झोप लागली असावी. त्यानंतर तिथल्या लोकांनी आम्हाला जवळच्या एका हॉस्पिटल यामध्ये नेलं. या अपघातानंतर तिचे वडील चेन्नईहून तातडीने आले. त्यावेळी ते ज्या विमानाने आले त्याआधीचं विमान क्रॅश झालं होतं, त्यामुळे कुटुंबावर एकाच वेळी दुहेरी धक्का बसला होता. हॉस्पिटल मध्ये असताना सतत पोटदुखत होते म्हणून सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सांगितलं कि अवस्था नाजूक आहे. रक्तस्त्राव होत असल्याने HBS फक्त ३-४ इतके राहिले होते. त्यामुळे उपचार घेण्यासाठी जरा जरी उशीर झाला असता तर मी तशीच झोपेत संपले असते.


पुढे ती म्हणते सांगलीचे डॉ. जाधव यांनी ऑप्रेशन न करण्याचा सल्ला दिला आणि नुसत्या गोळ्यांवर शरीरातला रक्तस्त्राव थांबवला. आणि सुदैवाने माझ्या शरीराने हि याला उत्तम साथ दिली.
अपघातात डाव्या हाताला लागले होते आणि त्त्याची खून अजूनही माझ्या हातावर आहे आणि ती मी तशीच ठेवली आहे. कारण ती खून सतत मला माझ्या पुनर्जन्माची आठवण करून देते.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’