श्रीवर्धन डेपोच्या बसगाड्यांचे अतिरिक्त थांबे रद्द करा

श्रीवर्धन (वार्ताहर) : श्रीवर्धन डेपोच्या बसला गोवा हायवेवरील सर्व थांबे देत असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पनवेल व वडखळ बस स्थानकातून महामार्गावरील स्थानिक प्रवासी बसमध्ये चढत असल्याने श्रीवर्धन म्हसळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहून किंवा इतर आगाराच्या बसने प्रवास करावा लागतो.


गाड्यांमध्ये आधीच प्रचंड गर्दी असताना देखील हायवेच्या थांब्यांवरील प्रवासी घेतले जातात. यामुळे श्रीवर्धनच्या प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत असून त्यात महिलांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुद्धा निर्माण होतात. पनवेल पेन, पनवेल माणगाव, पनवेल महाड या बस विनावाहक विना थांबा चालवण्यात येतात. त्यामुळे या क्षेत्रातील स्थानिक प्रवाशांची जबाबदारी फक्त श्रीवर्धन आगारानेच का उचलावी? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे. आधीच दोन आगारातील अंतर जवळपास ६३ किमी तसेच २ तालुक्यातील प्रवाशांची जबाबदारी एकट्या श्रीवर्धन आगारावर असताना श्रीवर्धन आगारावर महामार्गावरील लोकल थांब्यांची जबाबदारी का टाकण्यात येते.


त्यामुळे श्रीवर्धन बस स्थानकाला अतिरिक्त देण्यात आलेले लोकल बसथांबे बंद करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून महामंडळाकडे करण्यात येत आहे. श्रीवर्धन डेपोच्या बसगाड्या फक्त नियोजित थांब्यांवरच थांबाव्यात. यामुळे श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील स्थानिक प्रवाशांना आरामदायक व सुरक्षित तसेच आपल्या गावच्या बसने प्रवास करता येईल. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Raigad : शारलोट लेक रिकामा, पर्यटनाचा हंगाम कोरडा; माथेरानकरांचा व्यवसाय ठप्प?

रायगड : पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या माथेरानच्या पर्यटनाला यंदा शारलोट लेक रिकामा केल्याचा मोठा

Mumbai Goa Highway : कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर पाण्याची गळती सुरूच

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भुयारी मार्गामध्ये

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर