शेरी सिंगने घडवला इतिहास; बनली भारताची पहिली 'मिसेस युनिव्हर्स'

नवी दिल्ली : भारतासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक वर्ष आहे यात काही वाद नाही . ऑगस्टच्या "मिस युनिव्हर्स" या स्पर्धेनंतर भारताने पुन्हा एकदा आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. भारताची शेरी सिंग ने "मिसेस युनिव्हर्स" हा खिताब मिळवला आहे. हा खिताब भारताने पहिल्यांदाच जिंकला आहे.


४८ व्या मिसेस युनिव्हर्सचा ग्रँड फिनाले हा फिलिफिन्स मधील ओकाडा येते आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा जगभरातील १२० स्पर्धकांमध्ये रंगली होती. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शेरी सिंग हिने संयम, वक्तृत्व आणि महिला सक्षमीकरण या विषयांकडे परीक्षकांचे लक्ष वेधत त्यांचे मन जिंकले. तिचा शांतपणा, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे टाळ्यांच्या गडगडाटात तिने हा खिताब जिंकला. मिसेस युनिव्हर्सचा मुकुट परिधान केल्यानंतर शेरी सिंग म्हणाली " हा विजय फक्त माझाच नाही तर त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिने मर्यादा ओलांडून स्वप्न पाहण्याचे धाडस केले आहे.


विवाहित स्त्रियांसाठी केली जाणारी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा केवळ सौंदर्यच नव्हे तर बुद्धिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीची देखील जाणीव करते. २०२५ मधील या स्पर्धेने महिला सशक्तीकरणासाठी महिला नेत्या, उद्योजक, यांना जागतिक बंधुत्वाच्या उद्देशाने एकत्रित आणण्याचे काम केले.


स्पर्धेसाठी शेरीची निवड करणाऱ्या आणि त्यांना तयार करणाऱ्या यूएमबी पेजंट्सच्या राष्ट्रीय संचालक म्हणाल्या "आम्हाला नेहमीच शेरीच्या क्षमतेवर विश्वास होताच. तिच्या या ऐतिहासिक विजयाने भारताची मान उंचावली आणि आपल्या आत्मविश्वासाने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक स्त्री समोर आदर्श निर्माण केला आहे

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे