रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती


मुंबई: भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने क्रीडा आणि ॲथलिशर (Athleisure) जगात एक मोठी खेळी खेळली आहे. सचिन तेंडुलकर, कार्तिक गुरुमूर्ती आणि करण अरोरा यांनी सह-स्थापना केलेला, SRT10 ॲथलिशर प्रा. लि. अंतर्गतचा, ‘TEN x YOU’ या इनसाइट-ड्रिव्हन स्पोर्टस ब्रँडचे अधिकृत लाँचिंग आज झाले. सचिनच्या २४ वर्षांच्या ऑन-ग्राउंड अनुभवावर आणि खेळाडूंच्या गरजांच्या सखोल आकलनावर हा ब्रँड आधारित आहे, ज्यामध्ये विचारपूर्वक केलेले डिझाईन, जागतिक मानक आणि अतुलनीय आराम यांचा मिलाफ आहे. या ब्रँडने विशेषतः भारतीय शरीरयष्टी आणि पायांसाठी उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.


केवळ उत्पादन नव्हे, तर अनुभव


हे लाँचिंग केवळ उत्पादनाचे प्रदर्शन नव्हते, तर 'TEN x YOU' चा आत्मा आणि तत्त्वज्ञान दर्शवणारा एक मनोरंजक अनुभव होता. गियर स्टोरीटेलिंग झोन, संवादात्मक उत्पादन चाचण्या आणि प्रामाणिक कंटेंट स्पेसेस अशा प्रत्येक टचपॉइंटवरून ब्रँडची क्रीडा संस्कृतीतील खोल मुळे अधोरेखित झाली. उपस्थित लोकांनी डिझाईन प्रक्रिया आणि कामगिरीचा अनुभव प्रत्यक्ष घेतला. क्रिकेट क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि उत्साही लोकांनी ‘TEN x YOU’ च्या या विश्वासाला दुजोरा दिला की, खरी नवनिर्मिती तिथेच सुरू होते जिथे खेळ खऱ्या अर्थाने खेळला जातो.


सचिन तेंडुलकरची प्रेरणादायी भूमिका


या लाँचवेळी बोलताना ‘TEN x YOU’ चे सह-संस्थापक आणि मुख्य प्रेरणा अधिकारी सचिन तेंडुलकर म्हणाले, “अरुंद गल्ल्यांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत आणि गावच्या मैदानातून ते शहरातील मोठ्या स्टेडियमपर्यंत एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य. लहानपणी मी ऊन-पाऊस अशा प्रत्येक वातावरणात खेळण्याचा खूप आनंद घेतला. जेव्हा जेव्हा मी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानावर उतरलो, तेव्हा मला एक साधा आनंद जाणवला आणि माझ्या या दुसऱ्या इनिंगमध्येही ती भावना आजही माझ्यासोबत आहे.”


‘खेळातून मिळणारा आनंद अनुभवण्यासाठी खेळा!’


“यासाठी, गल्लीपासून स्टेडियमपर्यंत प्रत्येकाने खेळावे, प्रशिक्षण घ्यावे आणि तो आनंद अनुभवावा जो मी अनुभवला! 'TEN x YOU' सह, माझ्या बॅट आणि किटसाठी मी ज्या तपशीलाची मागणी केली होती, तेच लक्ष आम्ही तयार केलेल्या प्रत्येक ॲथलिशर उत्पादनात दिले आहे. त्यामुळे फक्त सुरुवात करा आणि खेळणे कधीही थांबवू नका!” उपस्थितांनी प्रत्येक शूजमध्ये वापरलेली तंत्रज्ञान आणि कारागिरी पाहिली, ज्यात भारतीय खेळपट्ट्यांवर स्थिरता आणि पकड (ग्रेप) वाढवण्यासाठी सचिनने स्वतः डिझाइन केलेले अतिरिक्त स्पाइक फीचर समाविष्ट आहे.


भारतीय गरजांवर आधारित उत्पादन


‘TEN x YOU’ चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक गुरुमूर्ती यांनी सांगितले: “हा ब्रँड अंतर्ज्ञानाने प्रेरित आणि किरकोळ विक्रीसाठी सज्ज आहे. सचिन तेंडुलकरचा अनुभव आणि त्यांच्या प्रवासातील वास्तविक जगातील अंतर्दृष्टी वापरून अशी उत्पादने डिझाईन करायची होती जी प्रत्येक भारतीयांसाठी, वय किंवा लिंग विचारात न घेता, ‘गो-टू चॉईस’ (Go-to choice) बनतील आणि त्यांना खेळण्याचे त्यांचे तरुण दिवस पुन्हा जगण्यास मदत करतील. आपली शरीररचना आणि हवामान परिस्थिती, ही सर्व माहिती लक्षात घेऊन आमची उत्पादने तयार केली आहेत.”


ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही किरकोळ विक्री (रिटेल) वाहिन्यांमध्ये मजबूत उपस्थिती निर्माण करण्याच्या योजनांसह, ‘TEN x YOU’ चे उद्दिष्ट आहे की, भारतातील प्रत्येक महत्त्वाकांक्षी खेळाडूला उत्कृष्ट दर्जाचे क्रीडा आणि ॲथलिशर गियर उपलब्ध व्हावे. क्रिकेटमधील महान व्यक्तीच्या अनुभवातून जन्माला आलेला हा ब्रँड भारतीय क्रीडा आणि फॅशन उद्योगात मोठे परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.

Comments
Add Comment

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर