सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देऊन, महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागात हरिजन वाडी, जाधव वाडी, चर्मकार वाडी, बौद्ध वाडी अशा जातिवाचक नावांनी कोणतेच रस्ते आणि वाड्यांचा उल्लेख होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा फार मोठा निर्णय असून पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबारमध्ये अनुसूचित जातीच्या शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पूर्ण केले. हा निर्णय जिल्ह्याच्या सामाजिक ऐक्याला बळकटी देणारा ठरणार आहे.


जुलै महिन्यात अनुसूचित जातीसाठी आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद आणि तक्रार निवारण जनता दरबारात पालकमंत्री राणे यांच्याकडे सामूहिक मागणी प्रलंबित असल्याची बाब निर्दशनास आणून देण्यात आली होती. ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा जातीवाचक नावाऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आदेश निर्गमित केला आहे. या अानुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण १९२ जातीवाचक वस्त्यांची व २५ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा शासन निर्णय जातिवाचक वाढीवस्त्यांची नावे बदलणे या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला.


ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णयान्वय निश्चित केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण १९२ जातीवाचक वस्त्यांची व २५ जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्याकरता ग्रामसभेचा ठराव पास करून, त्याबाबतचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते.


सदर प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेले होते. शासन निर्णयान्वये जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १९२ वस्त्यांची व २५ रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावत प्रस्तावित केलेली नावे शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार या आदेशाद्वारे जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

BMC : मुंबई महापालिकेत महायुतीचे २०० दिवस पूर्ण; पुढील ५ वर्षांत बदलणार मुंबईचा चेहरामोहरा?

मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तेचे २०० दिवस पूर्ण भाजपच्या कार्यकारीणीत मांडला राजकीय प्रस्ताव पुढील पाच

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या

Gautami Patil's programs Ban Demand : मुंबईतील दहीहंडी व गणेशोत्सवात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घाला; मुंबई शिक्षक मंडळाची मुख्यमंत्री व पोलीस प्रशासनाकडे मागणी

मुंबई : मुंबईतील दहीहंडी, गणेशोत्सव व इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शालीनता, धार्मिक

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान