BMC New Building : मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह 2029 मध्ये; टाऊन हॉल, जिमखान्यासह उभारणार नवी वास्तू

मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह सन 2029 मध्ये नवीन वास्तूत उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या वास्तूमध्ये टाऊन हॉल आणि जिमखान्याचाही समावेश असून, मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर आता टाऊन हॉल जिमखान्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यापूर्वीचा टाऊन हॉल जिमखाना उभारणीचा प्रस्ताव परत पाठवल्यानंतर आता सुधारीत आराखड्यानुसार नगरसेवकांच्या 320 आसनांसह पत्रकार कक्ष, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांची दालने व कार्यालये तसेच पत्रकार कक्ष आदींची रचना करत नव्याने बांधकामाचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. यामध्ये मात्र, याचा बांधकामाचा खर्च मागील वेळे प्रमाणेच 36 कोटी रुपये एवढा असून कंत्राटदारही तेच म्हणजे ठक्कर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यामुळे पुढील सव्वा दोन वर्षांमध्ये ही वास्तू उभारुन सन 2029 मध्ये महापालिकेचे सभागृह हे नवीन वास्तूत भरले जाण्याची दाट शक्यता आहे.



महापालिका मार्ग, मुंबई येथील फोर्ट विभागातील सी.एस. नं. 1444 आणि भाग क्र. 4/729 या भूखंडावर महानगरपालिका टाऊनहॉल जिमखान्याचा विकास करण्यासाठी यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये प्रस्ताव सादर झाला होता. परंतु, सध्याच्या महापालिका सभागृहाची जागा अपुरी पडत असल्याने टाऊन हॉलच्या जिमखान्यांच्या वास्तूत सभागृह उभारण्याची मागणी सभागृहनेत्यांनी स्थायी समितीत करून हा प्रस्ताव परत पाठवून सभागृहासह नवीन आराखडा बनवून सुधारीत आरखड्यासह सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुधारीत आराखड्यानुसार महापालिकेने पुन्हा निविदा मागवून हा प्रस्ताव सादर केला आहे.



या संकल्पनात्मक सुधारित आरखड्यामध्ये सांस्कृतिक दालन, वाहनतळ, बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, इनडोर खेळाकरिता जागा महापौर दालन व कार्यालय, उपमहापौर दालन व कार्यालय, महापालिका विरोधी पक्ष नेता दालन व कार्यालय तसेच प्रशस्त 320 नगरसेवक बसण्या करिता सभागृह, पत्रकार कक्ष आदींचा समावेश केला आहे. या बांधकामांमध्ये तळघर 1 अधिक तळघर 2 अधिक तळमजला आणि वरचे 4 मजले, 5 व्या मजल्याचा अंशतः भाग आणि व्युइंग गॅलरी, टेरेस मजल्यावरील काचेचा घुमट, कार लिफ्ट, कॅप्सूल लिफ्ट, स्टॅक पार्किंग इत्यादींचा समावेश आहे.


त्यामुळे स्थायी समितीने महापालिका सभागृहाचे बांधकाम अंतर्भूत करण्यासाठी हा प्रस्ताव परत पाठवला होता, तोच प्रस्ताव सुधारीत आराखडयानुसार पुन्हा निविदा मागवून सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या दिवाळीनंतर या कामाच्या भूमिपुजनाचा बार उडवून देत प्रत्यक्षात बांधकामाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या

BMC News: महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह! सातही इमारतींमध्ये बसवणार नवी सुरक्षा प्रणाली

मुंबई (सचिन धानजी) : रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडीट

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट

कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; तापमानात वाढ, काही भागांत हवेची गुणवत्ता खालावली!

शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, तर शहरभर अंशतः ढगाळ वातावरण