एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून फीडर बस सेवा सुरू

मेट्रो प्रवाशांचा प्रवास होणार आणखी सुलभ


१) बीकेसीमध्ये, मार्ग एनएससी, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय यांसारख्या प्रमुख ठिकाणांवरून जाईल.
२) वरळीमध्ये, सेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क यांना कव्हर करेल.
३) सीएसएमटीमध्ये, मार्ग जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी. मुखर्जी चौक, के. सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानकाशी
जोडला जाईल.


सिटीफ्लो अॅप, मेट्रोकनेक्ट ३ अॅपवर तिकीट सुविधा
गर्दीच्या वेळी या बस दर १० मिनिटांनी धावतील. सुरूवातीचे भाडे प्रति प्रवास २९ असून, मासिक पास ४९९ मध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खरेदीची सुविधा सिटीफ्लो अॅप तसेच मेट्रोकनेक्ट ३ अॅपवर एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात
आली आहे.


“मेट्रो मार्ग-३ मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत नवे पर्व घेऊन आली आहे. प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विश्वसनीय फीडर सेवा तितकीच महत्त्वाची आहे. सिटीफ्लोच्या माध्यमातून ही सेवा प्रवाशांच्या दारापर्यंत मेट्रोच्या सोयीचा विस्तार करेल”. - आर. रमणा, एमएमआरसी संचालक (नियोजन व रिअल इस्टेट विकास / एनएफबीआर)


मुंबई  : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आणि सिटीफ्लो यांच्या संयुक्त उपक्रमातून मेट्रोमार्ग ३ (अॅक्वा लाईन) प्रवाशांसाठी विशेष फीडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना प्रमुख स्थानकांवरून सहज प्रवाससुविधा उपलब्ध होणार आहेत.


एमएमआरसी आणि सिटीफ्लो यांचा हा उपक्रम मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकत्रीकरणातील महत्त्वाचे पाऊल ठरतो आहे. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. या फीडर बस सेवा सुरूवातीला तीन प्रमुख मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असतील : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), ज्यामुळे महत्त्वाच्या व्यावसायिक आणि निवासी भागांमध्ये सुलभ संपर्क साधता येणार आहे. या फीडर मार्गांमुळे नागरिकांना शाश्वत, सामायिक आणि तंत्रज्ञानाधारित प्रवास पद्धतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल, असे सिटीफ्लोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेरिन वेनाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण