Rain : यंदाच्या दिवाळीत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या ६ ते ७ दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. देशातील बहुतांश भागात २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी होणार असल्याने यावर्षी दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान, मुंबईतील अनेक भागात ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच अधूनमधून सौम्य पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुंबईतील बहुतांश भागात तापमान २३ डिग्री सेल्सियस ते ३६ डिग्री सेल्सियस या दरम्यान, राहण्याची शक्यता आहे.

याबरोबरच केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.तर स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येणाऱ्या दिवसांत दक्षिण तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची आणि हवेचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर