Mid Vaitarna Dam : मध्य वैतरणा धरणातील कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीडमध्ये लावलेली २ लाख झाडे गेली कुठे?

भाजपचे आमदार अमित साटम यांनी ठाकरे बंधूंना कर्जत ऐवजी बीडमध्ये जाण्याचे केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जेव्हा मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा मध्य वैतरणा धरणासाठी कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीड जिल्ह्यातील १३ गावांमध्ये ५४० हेक्टरवर दोन लाख झाडे लावण्यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. बीडमधील त्या वृक्षलागवडीच्या ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे बंधूंनी पर्यावरण पर्यटनासाठी जरूर जावे आणि जनतेला ती २ लाख झाडे दाखवावीत, असे प्रतिआव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी ठाकरेंसह काँग्रेसला दिले.


कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पप्रकरणी वृक्षतोडीवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना शुक्रवारी आमदार साटम यांनी भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. साटम म्हणाले, शाश्वत विकास भाजपसाठी कमिटमेंट असून विरोधकांसाठी केवळ फॅशन आहे. पर्यावरणाच्या नावाखाली ठाकरे बंधू आणि काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असून अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत.


ठाकरे बंधूंना व काही अभिनेत्यांना शाश्वत विकासाची शिकवणी लावण्याची गरज आहे. कर्जतचा पंप स्टोरेज प्रकल्प स्वच्छ ऊर्जेचे उत्तम उदाहरण आहे. हा प्रकल्प ३००० मेगावॅटचा असून ३७७ हेक्टरवर उभारला जात आहे. इतक्या मेगावॅटच्या औष्णिक प्रकल्पासाठी मुंबईच्या १५ पट जागा लागणार असून २८ कोटी वृक्ष लावावे लागतील, असा दावा आमदार साटम यांनी केला.



भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता झाला आहे. अनेक बड्या राष्ट्रांना भारताचे यश खुपते आहे. त्यामुळे कोणताही नवा प्रकल्प देशात उभा राहत असेल तर परदेशी मदतीच्या जोरावर शहरी नक्षलवादी त्याला विरोध करतात. आता त्यामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा गट आणि काही अभिनेते सामील झाले आहेत, असाही आरोप आमदार साटम यांनी केला. यावेळी आमदार साटम यांनी बीड जिल्ह्यात बृहन्मुंबई महापालिकेने २ लाख झाडे लावण्यासाठी निवडलेल्या १३ गावांतील साईटची छायाचित्रे दाखवली. ठाकरे बंधूंनी तेथे आवश्य पर्यटन सहल करावी, अशी टिप्पणी आमदार साटम यांनी केली.


गेल्या दहा वर्षांत देशातील आणि महाराष्ट्रातील वृक्षाच्छादनात वाढ झाली आहे. जगाची पंप स्टोरेज पॉवर क्षमता २०१ गीगावॅट झाली आहे. चीन, जपानने यामध्ये मोठी गती घेतली आहे. भारताची क्षमता केवळ ७.४३ गीगावॅट असल्याचे आमदार साटम यांनी सांगितले राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना आमदार साटम म्हणाले की , कर्जतच्या प्रकल्पामधून राज ठाकरे हे गुजरातला वीज पुरवणार असे खोटे कथानक पसरवत आहेत. रमेश किणी हत्या प्रकरणातील आरोपी सुमन शाह आणि लक्ष्मीकांत शाह हेही गुजरातचेच होते असे सांगत आमदार साटम यांनी राज ठाकरेंना जुनी आठवण करून दिली. महाराष्ट्राच्या प्रगतीला विरोध करून उद्धव आणि राज ठाकरे व काँग्रेस हे पाकचा अजेंडा राबवत आहेत, राज्याच्या विकासाच्या मुळावर आलेली ही मंडळी आहेत, असा आरोप आमदार साटम यांनी केला.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या वीज वापराचे होणार मूल्यांकन; महापालिकेच्या वतीने होणार तांत्रिक समितीचे लवकरच गठन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात

लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ! भाजप महायुतीच्या वतीने उत्तर मुंबईत भव्य पदयात्रेचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अराजकतेविरोधात जनजागृती

मुंबईच्या श्रीगणेशोत्सवाची पर्यावरणपूरक उत्सवाकडे यशस्वी वाटचाल; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे गौरवोद्गार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा

Central Railway Megablock: मुंबईकरांचे मेगाहाल होणार! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा सविस्तर

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि सुरक्षेची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी येत्या

Diva Station Megablock: दिवा स्थानकावर विशेष ब्लॉक, दोन एक्स्प्रेसला बसणार फटका; बाकीच्या गाड्यांचं शेड्युल्ड काय?

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळी प्रवास करणार आहात, तर ही

Western Railway Megablock: वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; वाचा अपडेट...

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न