कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तर, कोठडीतील छळामुळे कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास दोन ते चार लाख रुपयांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. अशा प्रकरणांतील दोषी पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांकडून भरपाईची रक्कम वसूल केली जाणार आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण जाहीर केले आहे.



कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणांत पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळवण्यासाठी न्यायालये किंवा मानवाधिकार आयोगांकडे दाद मागावी लागते. या प्रक्रियेत एकसूत्रता आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार राज्य सरकारने हे धोरण लागू केले आहे. नव्या धोरणानुसार, पोलीस मारहाण, अत्याचार किंवा बेकायदा दबावामुळे कोठडीत मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना पाच लाख रुपये दिले जातील. वैद्यकीय उपचार वेळेवर न मिळणे किंवा प्रशासकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यासही भरपाई देण्यात येईल. तसेच, कोठडीतील शारीरिक किंवा मानसिक छळामुळे कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास 50 टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्वासाठी दोन लाख रुपये, तर 50 टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्वासाठी चार लाख रुपये भरपाई दिली जाईल.



या भरपाईसाठी संबंधित पोलिसांवरील फौजदारी खटल्यात दोषसिद्धी होण्याची वाट पाहावी लागणार नाही. दोषी आढळलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून भरपाईची रक्कम त्यांच्या वेतनातून, निवृत्तीवेतनातून किंवा मालमत्तेतून वसूल केली जाणार आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण जाहीर केले आहे. दरम्यान, नैसर्गिक मृत्यू, कोठडीतून पळून जाताना झालेला अपघात किंवा पूर्वीपासून असलेल्या आजारामुळे झालेला मृत्यू या प्रकरणांना या धोरणांतर्गत भरपाई मिळणार नाही.



30 दिवसांत भरपाईची प्रक्रिया


घटना घडल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांनी आवश्यक कागदपत्रांसह भरपाईचा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांकडे पाठवणे बंधनकारक करण्यात आलेवआहे. सरकारी स्तरावर 30 दिवसांत मंजुरी देऊन भरपाईची रक्कम थेट पीडित किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र, अशी भरपाई दिल्याने दोषी पोलिसांवरील कारवाई टळणार नाही. अंतर्गत चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच, भरपाईची रक्कम त्यांच्याकडून वैयक्तिकरीत्या वसूल केली जाईल.

Comments
Add Comment

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; तापमानात वाढ, काही भागांत हवेची गुणवत्ता खालावली!

शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, तर शहरभर अंशतः ढगाळ वातावरण

Kurla Cleanliness Drive : कुर्ला परिसरातील झोपडपट्टी आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा आता साफसुफ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्‌यांच्या

Mid Vaitarna Dam : मध्य वैतरणा धरणातील कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीडमध्ये लावलेली २ लाख झाडे गेली कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जेव्हा मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा मध्य वैतरणा

मुंबई महापालिकेच्या वीज वापराचे होणार मूल्यांकन; महापालिकेच्या वतीने होणार तांत्रिक समितीचे लवकरच गठन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात

लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ! भाजप महायुतीच्या वतीने उत्तर मुंबईत भव्य पदयात्रेचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अराजकतेविरोधात जनजागृती

मुंबईच्या श्रीगणेशोत्सवाची पर्यावरणपूरक उत्सवाकडे यशस्वी वाटचाल; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे गौरवोद्गार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा