महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ; माझगाव डॉक येथे दोन नौकांचे २७ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दि. २७ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी दोन नौकांचे उद्घाटन होणार आहे.


हा उपक्रम राज्यातील समुद्री मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, या प्रकल्पाला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. या योजनेचा उद्देश मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील संसाधनांचा शाश्वत उपयोग प्रोत्साहित करणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे असा आहे.


राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली होती. प्रस्ताव प्रक्रियेनंतर जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्था, मुंबई शहर यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तयारी दर्शविली होती. एनसीडीसी यांच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेड, मालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.


प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबीची असून, ४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमता, स्टील हल बांधणी, रेफ्रिजरेटेड फिश होल्ड, तसेच जीपीएस, इको साऊंडर, व्हीएचएफ रेडिओ, एआयएस, रडार यांसारखी अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणाली यामध्ये बसविण्यात आली आहेत. या नौका १० ते १५ दिवसांच्या मासेमारी मोहिमेसाठी उपयुक्त असून, विशेषतः ट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशनसाठी योग्य आहेत.


या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹२०.३० कोटी असून त्यामध्ये एनसीडीएस कर्ज साहाय्य ₹११.५५ कोटी, केंद्र हिस्सा ₹४.०३ कोटी, राज्य हिस्सा ₹२.६८ कोटी व लाभार्थी संस्था हिस्सा ₹१२.०३ कोटी इतका आहे.


या नौकांच्या उद्घाटनामुळे महाराष्ट्रात खोल समुद्रातील शाश्वत मासेमारीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. यामुळे किनारी मासेमारीवरील दबाव कमी होईल, ट्यूना मासेमारीला चालना मिळेल आणि ब्लू इकॉनॉमी बळकट होईल. हा प्रकल्प “डीप सी ट्यूना फ्रॉम महाराष्ट्र” या उपक्रमाशी निगडीत असून, सागरी निर्यातीचे मूल्य वाढविण्यासह मच्छीमारांच्या उत्पन्नातही वाढ घडवेल. आधुनिक तंत्रज्ञान, शीत साखळी सुविधा आणि सहकारी व्यवस्थापनामुळे हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी विशेषतः एसडीजी १२ आणि एसडीजी १४ - सुसंगत ठरतो.


या निमित्ताने महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वतता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मासेमारी सुविधांचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट

कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; तापमानात वाढ, काही भागांत हवेची गुणवत्ता खालावली!

शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, तर शहरभर अंशतः ढगाळ वातावरण

Kurla Cleanliness Drive : कुर्ला परिसरातील झोपडपट्टी आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा आता साफसुफ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्‌यांच्या

Mid Vaitarna Dam : मध्य वैतरणा धरणातील कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीडमध्ये लावलेली २ लाख झाडे गेली कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जेव्हा मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा मध्य वैतरणा