खारघर, तळोजा परिसरातील जलपुरवठा होणार सुरळीत

सिडकोकडून नागरिकांना िदलासादायक निर्णय


खारघर  : खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये बुधवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, विनोद घरत, साजिद पटेल, आशा बोरसे, जगदीश घरत, सचिन वास्कर आणि संतोष पाटील यांनी नागरिकांच्या वतीने पाणी प्रश्नावर सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीला सिडकोचे अधीक्षक अभियंता पी.एम शेवतकर उपस्थित होते. बैठकीदरम्यान तळोजा फेज १ व २ तसेच खारघर सेक्टर २३, २७, ३०, ३४, ३५, ३६, ३९ आणि ४० या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिडकोने दिलेल्या लेखी पत्रानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. हेटवणे धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा वाढविण्यासाठी मागणी नोंदविण्यात आली. खारघर सेक्टर २६ मधील पंप हाउस येथे नवीन पंप बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर पुरवठा अधिक सुरळीत होईल.


भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सातत्याने पुढे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सांगितले की, नागरिकांच्या हितासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोकडे मागणी करत होतो. अखेर सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची
हमी दिली.

Comments
Add Comment

Karjat- Panvel Local: कर्जत- पनवेल मार्ग केव्हापासून सुरू होणार? आली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर माहिती

कर्जत: कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत, पनवेल

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत 16 तास पाणीपुरवठा बंद, कोणकोणत्या परिसराला फटका बसणार? वाचा यादी

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा विषयक कामे हाती घेण्यात येणार

Online Gambling : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापोटी डिलिव्हरी बॉय बनला सराईत गुन्हेगार; नवी मुंबई पोलिसांकडून नऊ गुन्हे उघडकीस

नवी मुंबई : ऑनलाईन जुगाराच्या (Online Gambling) व्यसनापायी पैशांची गरज भागवण्यासाठी एका 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयने

Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर

नवी मुंबई: नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये

नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; २६.३० कोटींचे ७२६ किलो ड्रग्स नष्ट!

नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्कराविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश

Navi Mumbai Traffic : अनंत चतुर्दशीनिमित्त नवी मुंबईमध्ये वाहतुकीत मोठे बदल; घरगुती प्रवाशांसाठी महत्त्वाचे रस्ते बंद, पर्यायी मार्गांची घोषणा

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप