विषारी कफ सिरप प्रकरणात ‘कोल्ड्रिफ’ कंपनीचा मालक न्यायालयीन कोठडीत

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात २० हून अधिक निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूस्थित श्रीसेन फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.


या प्रकरणात गोविंदन यांना यापूर्वी १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. या दरम्यान विशेष तपास पथक (SIT) ने त्यांची चौकशी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे केली. कोठडी संपल्यानंतर त्यांना परसिया येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौतम गुर्जर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयीन कोठडी दिली.


SIT प्रमुख जितेंद्र सिंग जाट यांनी सांगितले की, या प्रकरणात छिंदवाडातील डॉ. प्रवीण सोनी, घाऊक औषध विक्रेता राजेश सोनी आणि डॉ. सोनी यांच्या पत्नीच्या मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्ट सौरभ जैन हे तिघेही आधीच कोठडीत आहेत. तपासात उघड झाले आहे की ‘कोल्ड्रिफ’ सिरप प्यायल्यानंतर अनेक मुलांच्या किडनी निकामी झाल्या आणि त्यामुळे मृत्यू झाले.


या धक्कादायक घटनेनंतर सरकारने तत्काळ पावले उचलली आहेत. राज्य सरकारने दोन औषध निरीक्षक आणि FDAचे उपसंचालक यांना निलंबित केले असून, राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली करण्यात आली आहे. तसेच, संबंधित औषध उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे.


दरम्यान, स्थानिक न्यायालयाने डॉ. सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सरकारकडून भविष्यात कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

1 नोव्हेंबरपासून राज्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार...

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नक्षलग्रस्त भागातील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त

लडाखमध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा, मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी नागरिकांना 'एकता दिवस'ची दिली शपथ

[caption id="attachment_1070982" align="aligncenter" width="800"] लेह, लदाख मध्ये 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. लडाखच्या केंद्रशासित प्रदेश

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट

कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत आहे.