पाकचा कर्णधार बदलाचा सिलसिला सुरूच! मोहम्मद रिझवानकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले


लाहोर: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून अचानक हटवले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला संघाचा नवा वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


मोहम्मद रिझवानने गेल्या वर्षी (२०२४) ऑक्टोबरमध्ये बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर वनडे आणि टी-२० संघाची कमान स्वीकारली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने काही मालिका जिंकल्या असल्या तरी, या वर्षातील (२०२५) संघाची कामगिरी, विशेषतः वेस्ट इंडिजमधील मालिका पराभव आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून लवकर बाहेर पडणे, या पार्श्वभूमीवर पीसीबीने कर्णधारपद बदलण्याचा निर्णय घेतला.


रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने २० वनडे सामने खेळले, ज्यात ९ जिंकले आणि ११ गमावले. शाहीन आफ्रिदीची नियुक्ती व्हाईट-बॉल हेड कोच माईक हेसन आणि निवड समितीच्या बैठकीनंतर करण्यात आली आहे.



शाहीन आफ्रिदीवर पुन्हा विश्वास


शाहीन शाह आफ्रिदी याला यापूर्वीही टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर त्याला पदावरून हटवण्यात आले होते. आता त्याला पुन्हा एकदा वनडे संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शाहीन आफ्रिदी ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कर्णधार म्हणून पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारेल.


Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात