‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie: ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यांच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’, आणि हा चित्रपट १ जानेवारी २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचा घोषणा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला असून, "आता मराठी शाळा पुन्हा भरणार!" या घोषवाक्यासह नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना एक सुंदर भेट देण्याची तयारी सुरु आहे.


हा चित्रपट मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा अभिमान या अत्यंत भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित आहे. शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या युगात आपल्या मातृभाषेतील शिक्षणाचे मूल्य पुन्हा अधोरेखित करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल, असं बोललं जात आहे.


चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची प्रभावी फळी पाहायला मिळणार आहे. यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर हे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे, यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिचं हे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलं पदार्पण आहे.


दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “हा विषय माझ्या मनाच्या अगदी जवळचा आहे. मराठी शाळा म्हणजे आपली ओळख आहे. त्या केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संस्कार, संस्कृती आणि स्वाभिमानाची पाळंमुळं आहेत. या चित्रपटातून आम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.”


क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित हा चित्रपट नववर्षाच्या शुभारंभी प्रेक्षकांना भाषेचा आणि शिक्षणाचा नवा अर्थ समजावणारा ठरेल, अशी सर्वत्र चर्चा आहे.

Comments
Add Comment

Sanjay Gupta : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 Sanjay Gupta : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाला’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’

'रोजा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे चेन्नईत निधन; सिनेसृष्टी शोकसागरात

भारतीय चित्रपटसृष्टीवर आणि विशेषतः दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर एक मोठा आघात झाला आहे. गाजलेला चित्रपट 'रोजा' फेम

Eatha : 'मेरा भरोसा ही मेरा घमंड था रे'...अंगावर शहारे आणणारा 'ईठा'चा ट्रेलर रिलीज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या

Ibrahim Ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान यांचा ब्रेकअप? तीन वर्षांच्या नात्यानंतर विभक्त झाल्याची चर्चा

Ibrahim Ali Khan : बॉलिवूडमध्ये काही कलाकारांच्या नात्यांची चर्चा त्यांच्या अधिकृत कबुलीशिवायच रंगते. अभिनेत्री पलक

अंधारात हरवलेल्या साई पल्लवीला कुत्र्याच्या पिल्लाने दाखवला मार्ग; अनुभव ऐकून व्हाल थक्क!

नमित मल्होत्रा यांच्या 'रामायण' चित्रपटातील सीतेची भूमिका साकरणारी अभिनेत्री साई पल्लवी अलीकडेच एका टॉक

Ashwini Gorle : पैठणी फ्युजन गाऊनवरून ट्रोलिंग; अश्विनी गोरलेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली...

Ashwini Gorle: सोशल मीडियावर कलाकारांच्या लूकची चर्चा होणे नवीन नाही. मात्र, एखाद्या पोशाखावरून संस्कृतीचा अपमान