HUL Q2 Results: देशातील बडी एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचा निकाल जाहीर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३.८% वाढ कंपनीकडून Dividend जाहीर

मोहित सोमण: देशातील ग्राहक केंद्रित एफएमसीजी (Fast Moving Consumer Goods) बडी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) आपला दुसरा तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ३.८% वाढ झाल्याचे कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच कंपनीच्या एकत्रित नफ्यात (Consolidated Net Profit) १.५% किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे एकत्रित नफा १६३८८ कोटीवर पोहोचला असून कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३.८% वाढ झाल्याने नफा २६९४ कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा २६१२ कोटी रुपये होता. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर ०.५% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या १५५०८ कोटींच्या तुलनेत महसूल वाढत यंदा १५५८५ कोटी मिळाला.


उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (EBITDA) मात्र इयर ऑन इयर बेसिसवर २.३% घसरला आहे. गेल्या वर्षीच्या ३६४७ कोटींच्या तुलनेत यंदा ३५६३ कोटींवर ईबीटा घसरला. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) मध्येही ५% घसरण झा ली आहे. गेल्या वर्षीच्या २६११ कोटींच्या तुलनेत करोत्तर नफा २४७८ कोटीवर यंदा पोहोचला. कंपनीच्या संचालक मंडळाने १९ रूपये प्रति शेअर अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर केला आहे. संचालक मंडळाने (Board of Directors) दिलेल्या मा हितीनुसार, ७ नोव्हेंबर ही रेकोर्ड तारीख म्हणून घोषित करण्यात आली आहे. सकाळी निकाल जाहीर होताच कंपनीचा शेअर १.५% उसळत २६३०.५० रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता. दुपारी १२.०७ वाजेपर्यंत कंपनीचा शेअर १.३४% उसळत २६२६.३० रू पयांवर व्यवहार करत आहे.


'आम्ही तिमाहीत २% ची विक्री वाढ आणि एबिटडा [व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न) मार्जिन २३.२% सह स्पर्धात्मक कामगिरी केली' असे नायर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 'जीएसटीच्या नवीनतम सुधारणा ही उपभोग वाढवण्यासाठी सर कारचे एक सकारात्मक पाऊल आहे, ज्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांची भावना सुधारेल अशी अपेक्षा आहे. तथापि, बाजाराने या बदलांशी जुळवून घेतल्याने या तिमाहीवर क्षणिक परिणाम झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून, किमती स्थिर झा ल्यानंतर, हळूहळू आणि शाश्वत बाजार पुनर्प्राप्तीचा मार्ग मोकळा झाल्यावर, सामान्य व्यापार परिस्थितीची अपेक्षा आहे' नायर पुढे म्हणाल्या आहेत.

Comments
Add Comment

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण