फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, आरोपी PSI गोपाळ बदनेचा ४८ तासांचा थरार, सोलापूर ते बीडपर्यंतचा प्रवास उघड

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्य हादरले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नोटमध्ये बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख असून, या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.


डॉ. मुंडे यांच्या मृत्यूनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने फलटणमधून फरार झाला. त्याने आपला मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा दिला. पोलिसांनी सुरुवातीला त्याचा शेवटचा ठावठिकाणा पंढरपूर परिसरात असल्याचे शोधले. त्यानंतर तो सोलापूरमार्गे बीड येथे आपल्या घरी पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस तपासात उघड झाले की, बदने हा दोन दिवसांपर्यंत विविध ठिकाणी फिरत राहिला आणि या काळात त्याने आपल्या मोबाईलमधील काही महत्त्वाचे पुरावे डिलीट केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही बदनेचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बडतर्फीचा इशारा दिल्यानंतर त्याने शरणागती पत्करली. आश्चर्याची बाब म्हणजे, फरार असतानाही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटण पोलिसांशी संपर्कात होता. या काळात त्याने काही विशिष्ट पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचीही माहिती समोर आली आहे.


तपासादरम्यान बदनेने चौकशीत आपल्यावरचे आरोप फेटाळले आणि डॉ. मुंडे यांच्यावर कोणताही अत्याचार केला नाही असा दावा केला. मात्र, त्यांच्या दोघांमधील संबंधांचे स्वरूप काय होते, यावर तो मौन बाळगत आहे. सध्या पोलिस बदनेला बीडपर्यंत पोहोचवण्यात कोणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय वर्तुळ आणि पोलिस विभागात चर्चेचे वादळ उठले आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील सत्य आणि आरोपींना कोणाचा पाठिंबा होता, हे समोर येण्यासाठी पोलिस तपास वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : भक्ती, श्रद्धा अन् दिव्य प्रकाशाचा संगम, गोदावरी आरतीचे विलोभनीय दृश्य

सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय पर्वात नाशिकच्या गोदावरी तीरावर आणखी एका ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

1 नोव्हेंबरपासून राज्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार...

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 चा दिमाखात शुभारंभ; 5 फोटोंमधील विशेष झलक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पूर्वतयारी आणि धार्मिक आयोजनाचा भव्य शुभारंभ देशाच्या राष्ट्रपती

सिंहस्थ महाकुंभ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागतिक ठसा उमटवणारा ऐतिहासिक सोहळा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक: सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची प्राणशक्ती आणि सामाजिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधीवत गोदा महाआरती संपन्न

नाशिक : या पावन भूमीत प्रभू श्रीरामांचे चरणकमळ उमटले, त्याच नाशिकच्या दक्षिण गंगेच्या तीरावर आज आध्यात्मिक

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नक्षलग्रस्त भागातील नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त