आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर पदोन्नती या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील तीन वर्षे संयम राखून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना लढा देत आहे.


आकृतीबंधाची अंमलबजावणी न करताच महसूल विभागीय बदल्या हा नवीनच अडथळा उभा करुन कर्मचारीवर्गात भीतीदायक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाने वर्षभरापूर्वी अयशस्वी प्रयत्न केला. परंतु संघटनात्मक ताकदीच्या बळावर तीन दिवसीय लढा देऊन बदल्यांबावत पूर्वीचीच पद्धत अनुसरण्यास प्रशासनास भाग पाडले त्यासमयी परिवहन आयुक्तांनी एक महिन्यात सर्व सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर तयार करुन घेतो, व पदोन्नतीसह इतर सर्व मागण्याही पूर्ण करतो, असे आश्वस्त केले होते. म्हणूनच संप सहकार्याच्या भावनेतून स्थगित केला. परंतु प्रलंबित मागण्यांवावत मागील वर्षभरात कोणतीच ठोस कार्यवाही केली गेली नाही.


कामगार नेते विश्वास काटकर, यांनी स्वतः परिवहन आयुक्त यांची या मागण्यांबाबत भेट घेतली. त्या वेळेस सर्व पदोन्नती आदेश पारित करण्यात येतील, असे आश्वासन परिवहन आयुक्त यांनी दिले. परंतु ते आश्वासनही हवेत विरले. शेवटी दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी पदाधिकारी मंडळाची तातडीची आभासी सभा घेऊन पदाधिकारी मंडळाचे बेमुदत साखळी उपोषण, परिवहन आयुक्त कार्यालय परिसरातच करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. याची दखल स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेऊन स्वतःच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले.




परिवहन विभागात वेळेवर पदोन्नत्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे मधल्या कालावधीत ७० कर्मचाऱ्यांना पदोन्नतीविना सेवानिवृत्त व्हावे लागले. गेल्या तीन वर्षात सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ देणारे पदोन्नती सत्र कुलूपबंद आहे. हे वास्तव मंत्र्यांसमोर मांडण्यात आले. सेवा भरती नियम नाहीत म्हणून पदोन्नती नाही हा प्रशासनाचा बचाव मंत्री महोदयांसमोर टिकू शकला नाही. मध्यवर्तीचे नेते काटकर यांनी प्रशासकीय कार्यपद्धतीला कोणताही विरोध न करता परिवहन विभागाकडून होत असलेल्या अनावश्यक प्रशासकीय दिरंगाईवर सोदाहरण बोट ठेवले.


उपरोक्त मुद्यांबाबत परिवहन आयुक्तांनी विचार करुन संघटनेच्या भूमिकेशी सकारात्मकता दाखविली व कालबद्ध पदोन्नती व विभागीय पदोन्नती आदेश पुढील आठवड्यात काढले जातील, असे मंत्री महोदयांसमोर आश्वस्त केले. परंतु सदर आश्वासनाची आठवडा जाऊनही कोणतीच पूर्तता केली गेली नाही. शेवटी नाईलाजास्तव दि. २७ ऑक्टोबर २०२५ पासून "बेमुदत साखळी उपोषण" आंदोलन सुरु होणार आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने