सोलापूरमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी! चार बड्या नेत्यांची दमदार इनकमिंग

सोलापूर: सध्या राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान सोलापूरमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याचे दिसून येते.



राज्यात निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु असते. मात्र एकाच वेळी चार जणांनी पक्षांची साथ सोडल्याने महाविकास आघाडीला मध्ये मोठे खिंडार पडले आहे. यामुळे भाजपचे ऑपरेशन लोटस सोलापूरमध्ये यशस्वी होताना दिसत आहे. हा पक्षप्रवेश बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.




माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी रणजित शिंदे यांचा ३० हजार मतांच्या फरकाने मोठा पराभव केला होता. या पराभवानंतर रणजित शिंदे यांनी आता भाजप पक्षात प्रवेश करून माढा मतदारसंघात नवी राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजित शिंदे यांचा हा निर्णय माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरणार आहे.



रणजित शिंदे यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या भाजपच्या हालचालींना बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 चा दिमाखात शुभारंभ; 5 फोटोंमधील विशेष झलक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पूर्वतयारी आणि धार्मिक आयोजनाचा भव्य शुभारंभ देशाच्या राष्ट्रपती

सिंहस्थ महाकुंभ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जागतिक ठसा उमटवणारा ऐतिहासिक सोहळा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक: सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची प्राणशक्ती आणि सामाजिक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधीवत गोदा महाआरती संपन्न

नाशिक : या पावन भूमीत प्रभू श्रीरामांचे चरणकमळ उमटले, त्याच नाशिकच्या दक्षिण गंगेच्या तीरावर आज आध्यात्मिक

Ladki Bahin Yojana : 1500 की 3000 ? लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर

Narendra Modi: एकता नगरचे भव्य वर्षावन; बाराही महिने मान्सूनचा अनुभव आणि काचेचा स्कायवॉक

[caption id="attachment_1070988" align="aligncenter" width="800"] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील एकता नगर (केवडिया) येथे एका भव्य आणि

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक