यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त


ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त आहेत. वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशपनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. वावर्षी भागवत एकादशी २ नोव्हेंबरला आहे. द्वादशीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो. तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा आहे. यावर्षी तुळशीचा विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार, २ नोव्हेंबरपासून, कार्तिक


पौर्णिमा शुक्रवार, ५ नोव्हेंबरपर्यंत करावयाचा आहे. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना प्रारंभहोईल. डिसेंबर २०२५ मध्ये लग्नासाठी ४, ५ आणि ६ डिसेंबर या तीन शुभ तारखा आहेत.  जानेवारी २०२६ या महिन्यात शुक्र ग्रहाच्या दहनामुळे आणि इतर प्रतिकूल घटकांमुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही. त्यामुळे, लग्न करण्यासाठी हा काळ शुभ नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ५, ६, ८, १०, १२, १४, १९, २०, २१, २४, २५ आणि २६ या दिवशी विवाह मुहूर्त आहेत. मार्च हा एक संक्रमणकालीन महिना म्हणून ओळखला जातो, जो उबदार वसंत ऋतूचे स्वागत करतो आणि हिवाळ्याला निरोप देतो.


मार्च २०२६ मध्ये २, ३, ४, ७, ८, ११, १२ रोजी विवाह मुहूर्त आहेत. एप्रिल हा फुलांचा महिना, जेव्हा वसंत ऋतू त्याच्या शिखरावर असतो. या महिन्यात १५, २०, २१, २५, २७, २८ आणि २९ तारखेला विवाह मुहूर्त आहेत. मे २०२६ मध्ये हिंदू पंचांगामध्ये लग्नासाठी ८ शुभमुहूर्त आहेत. त्यात १, ३, ५, ६, ७, ८, १३ आणि १४ मे २०२६ या तारखांचा समावेश आहे. जून २०२६ महिन्यात २१, २२, २३, २४, २५, २६, २७ आणि २९ जून २०२६ या ८ तारखांना लग्नाचे मुहूर्त असल्याचे हिंदू पंचांगामध्ये नोंद आहे.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी