बंडगार्डनमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने मेट्रो प्रकल्पाच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३, रा. पिंपरी), यश प्रसाद भंडारी (२३, रा. थेरगाव, पिंपरी) आणि खुशवंत किशोर टेकवानी (१९, रा. बीड) या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ऋत्विक आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या खुशवंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही रविवारी पहाटे कारने प्रवास करत होते.


चालक ऋत्विक भंडारी याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. अपघातानंतर घटनास्थळी लष्कर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, तसेच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. दोघांचे मृतदेह आणि जखमीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान खुशवंतचा मृत्यू झाला.


याप्रकरणी पोलिस अंमलदार रूपेश पांगारे यांनी फिर्याद दाखल केली असून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून अपघाताचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. मृतांपैकी ऋत्विक भंडारी हा एमबीए फायनान्सचा विद्यार्थी होता, यश भंडारी आयटी कंपनीत कार्यरत होता, तर खुशवंत टेकवानी हा पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता. तरुण वयात या तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

BJP-MNS Clash : माहिममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून वाद

दादरमध्ये तणाव, कार्यकर्त्यांची धरपकड मुंबई : पुण्यात शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही

OBC Cabinet Sub Committee : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर ३ मंत्र्यांचा बहिष्कार

- छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश मुंबई : ओबीसी महामंडळाला योग्य प्रमाणात निधीची तरतूद केली

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) महावितरणच्या

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24