भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट


नवी मुंबई :




  1. भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

  2. भारताने नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात (Final Match) दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि महिला विश्वचषक २०२५ नाव कोरले.

  3. अंतिम सामन्यात (Final Match) नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या पराभवाचे एक कारण ठरला.

  4. भारताने महिला विश्वचषक २०२५चा अंतिम सामना (ICC Women World Cup 2025, Final Match) ५२ धावांनी जिंकला. या सामन्यात ५० षटकांत २९९ धावा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर होते. पण धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत आटोपला. याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या.

  5. भारताकडून शफाली वर्माने अंतिम सामन्यात सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तिनं ७८ चेंडूत दोन षटकार आणि सात चौकार मारत ८७ धावा केल्या. ही कामगिरी करणारी शफाली सामनावीर झाली.

  6. भारताच्या दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात सर्वाधिक पाच बळी घेतले. फक्त ९.३ षटकांत ३९ धावा देत तिनं दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. दीप्तीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नऊ सामन्यांत सर्वाधिक २२ बळी घेतले. ही कामगिरी करणारी दीप्ती मालिकावीर झाली.

  7. BCCIने महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले

  8. महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना ४२व्या षटकांत सामना भारताच्या दिशेने एकदम झुकला. या षटकांत दीप्ती शर्माने पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार असलेल्या लॉराला बाद केले. दीप्तीने टाकलेल्या चेंडूचा लॉराला व्यवस्थित अंदाज घेणे जमले नाही. फटका मारण्याच्या नादात झेल उडाला आणि अमज्योतने चेंडू व्यवस्थित झेलला. हीच ती महत्त्वाची विकेट होती, कारण लॉराने ९८ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या. लॉरा बाद झाली आणि दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी फळीच गारद झाली. यानंतर तळाच्या फलंदाजांना भारताने अवघ्या २६ धावांत तंबूत धाडले. लॉरा बाद झाली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती ४१.१ षटकांत सात बाद २२० अशी होती आणि सामना संपला त्यावेळी ४५.३ षटकांत २४६ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद झाले होते.

  9. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

  10. महिला वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे शिल्पकार प्रशिक्षक अमोल मुझुमदार


Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम