रोहित शर्मा कर्णधार होणार का?
सूत्रांनी एका वृत्तपत्राला माहिती देत सांगितलं की, 'रोहित शर्माने सुरूवातील तिलक वर्माचं नाव सुचवलं होतं. पण फ्रेंचायझीने रोहित शर्माकडे ही जबाबदारी घ्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर त्याने होकार दिला. न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहित शर्मासोबत अनेक चर्चा झाल्या होत्या आणि नवीन प्रशिक्षकांच्या नियुक्तीबाबतही त्याच्याकडून सल्ले घेतले होते.' मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी यावर बोलताना सांगितलं की, 'ही फक्त एक चर्चा आहे. जोपर्यंत आम्ही ट्रे विंडो आणि रिटेनमेंट पूर्ण करत नाहीत, तोवर आम्ही यावर निर्णय घेणार नाही. एका हंगामात कर्णधार असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण तो अजूनही खेळत आहे. त्याला जोपर्यंत खेळायचं आहे तो पर्यंत तो खेळेल. '
[caption id="attachment_1070638" align="aligncenter" width="800"] सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे धर्मध्वज फडकवला जाणार आहे. या दोन्ही ...
हार्दिक पांड्याचं काय होणार?
ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्याला कोण घेणार की नाही? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ट्रेड झाली नाही तर हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळण्यास तयार असल्याची माहिती आहे. 2024 च्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्सकडून ट्रेड पांड्याला मुंबई इंडियन्सने घेतलं होतं. तसेच कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांनी फ्रेंचायझीवर बरीच टीका केली होती. वानखेडे स्टेडियममधील प्रेक्षकांनी घरच्या सामन्यांमध्ये पांड्याला वारंवार हुसकारलं होते.