IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

न्यूझीलंडने चौथ्या टी20 सामन्यात भारताचा दारूण पराभव केला आहे. या विजयासह मालिकेत 3-1 अशी स्थिती झाली आहे. खरं तर ही मालिका भारताने तिसऱ्या सामन्यानंतरच जिंकली होती. त्यामुळे या पराभवाचा मालिकेवर तसा काही फरक पडलेला नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला, पण सामना न्यूझीलंडने जिंकला. चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 7 गडी गमवून 259 धावा केल्या. तसेच विजयासाठी 260 दिल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला. भारतीय संघ या धावांचा पाठलाग करताना 172 धावा करू शकला.. भारताने हा सामना 87 धावांनी गमावला आणि मालिकेत 3-1 अशी स्थिती झाली. खरं तर भारताची विजयी लय पाहता या मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडने चौथ्या टी20 सामन्यात कमबॅक केलं आणि व्हाईटवॉशचं संकट टाळलं.

भारताचा डाव


न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव पहिल्या षटकात गडबडला. पहिल्या जेकब डफीने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. संजू सॅमसन आणि इशान किशन यांना पहिल्याच षटकात तंबूत पाठवलं. संजू सॅमसन 4 धावांवर बाद झाला, तर इशान किशनला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फार काळ मैदानात तग धरून खेळता आलं नाही. अभिषेक शर्मा 15 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्या पाठोपाठ श्रेयस अय्यरही 22 धावांवर बाद झाला. अक्षर पटेल 7, नितीश कुमार रेड्डी 21 धावांवर तंबूत परतले आणि भारताचा पराभव निश्चित झाला. नमन धीर आणि तिलक वर्माने 16 चेंडूत 32 धावा केल्या. पण ही जोडीही फार काळ टिकली नाही. नमन धीर 13 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला अर्शदीप सिंग पहिल्या चेंडूवर तंबूत परतला.


ऑकलँडचा इतिहास बदलला


भारताने यापूर्वी ऑकलंडमध्ये तीन टी20 सामने खेळले होते. तिन्ही सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली होती. पण चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला इतिहास बदलला. न्यूझीलंडने मालिकेतील आणि मैदानातील चौथ्या सामन्यात इतिहास बदलून टाकला. या मैदानात आता 3-1 अशी स्थिती झाली आहे.
Comments
Add Comment

World Record: T20 मध्ये नवा इतिहास, दिग्गज गोलंदाजही मागे; राशिद खानचा क्रिकेट विश्वात नवा विक्रम

[caption id="attachment_1070550" align="aligncenter" width="800"] अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

[caption id="attachment_1070541" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर

गौतम गंभीरसाठी IPL च्या 4 संघांमध्ये मोठी चुरस; एका फ्रँचायझीसोबत चर्चा देखील सुरू!

Gautam Gambhir: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा भारतासोबतचा करार 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे, परंतु

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगचं दीड शतक, मिचेल सँटनरला केलं शिकार

[caption id="attachment_1070515" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरू असून धडाधड विक्रम रचले गेले आहे. आतापर्यंत

Hong Kong Sixes: शशांक सिंगची फटकेबाजी; मात्र भारताला पाकिस्तानविरुद्ध विजयाने हुलकावणी

हॉंगकॉंग : हॉंगकॉंग इंटरनॅशनल सिक्सेस स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'क' गटातील सामना चांगलाच रंगला.

IND vs NZ: प्रसिद्ध कृष्णाची वनडे संघातून थेट भारत 'A' मध्ये रवानगी; जाणून घ्या मोहम्मद सिराजबाबत काय ठरलं?

[caption id="attachment_1070498" align="aligncenter" width="800"] भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवड समितीने एक