Thursday, October 15, 2026

पीएसआय गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ

सातारा : फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी काढला.

फलटण येथे २३ ऑक्टोबर रोजी एका डॉक्टर युवतीने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. फौजदार गोपाळ बदने याने चार वेळा अत्याचार केला, तर इंजिनीयर प्रशांत बनकर याने मानसिक छळ केला, असे पीडित युवती डॉक्टरने तळहातावर लिहिल्याचे समोर आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >