एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक

प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकरांसह अन्य उमेदवारांची माघार


मुंबई :  मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमसीए’च्या बुधवारी (१२ नोव्हेंबर) होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी एकूण आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी (१० नोव्हेंबर) अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या अखेरच्या दिवशी अजिंक्य नाईक वगळता सर्वच उमेदवारांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे नाईक यांना ‘एमसीए’ अध्यक्ष म्हणून सलग दुसरा कार्यकाळ मिळणार हे स्पष्ट झाले.


‘एमसीए’ अध्यक्षपदासाठी नाईक यांच्यासह भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी, भाजप आमदार प्रसाद लाड, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र आणि मुंबई टी-२० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, ‘एमसीए’चे माजी सहसचिव शाह आलम शेख आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य सुरज समत यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, सोमवारी नाईक वगळता सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज  मागे घेतले.


आ. जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. या पदासाठी त्यांच्यासमोर ठाण्याच्या यंग स्टार्स क्रिकेट क्लबकडून अर्ज दाखल केलेल्या नवीन शेट्टी यांचे आव्हान असेल.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण