भारत - द. आफ्रिका कसोटी मालिकेत आधी टी, मग लंच ब्रेक!

क्रिकेटची सुमारे १५० वर्षांची परंपरा मोडीत


मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळली जाईल, तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार आहे. या दुसऱ्या कसोटीत एक अनोखा बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे लंचपूर्वी टी ब्रेक घेतला जाणार आहे. भारतात कसोटी सामन्यांमध्ये असा बदल प्रथमच होणार आहे.


टॉस, लंच, चहा, स्टंप (दिवसाचा खेळ संपला)… कसोटी सामन्यांमध्ये हा नेहमीचा क्रम आहे, परंतु २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा क्रम बदलणार आहे. पहिल्यांदाच खेळाडूंना लंचच्या आधीच टी ब्रेक मिळेल. देशाच्या पूर्व भागात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होता, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.


गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळाचा पहिला सत्र सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ११ ते ११.२० वाजेपर्यंत टी ब्रेक दिला जाईल. दुसरे सत्र ११.२० ते दुपारी १.२० या वेळेत खेळले जाईल आणि मग १.२० ते २ वाजेपर्यंत लंच ब्रेक असेल. अखेरचे सत्र दुपारी २ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पार पडेल. मैदानावर अतिरिक्त खेळण्यासाठी वेळ मिळावा यासाठी टी ब्रेकच्या सत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.


गुवाहाटीत सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे सामना सकाळीच लवकर सुरू करावा लागतो. खेळाचा वेळ वाढवण्यासाठी लंचपूर्वी टी ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामन्यामध्ये दोन तासांचा खेळ होतो, त्यानंतर ४० मिनिटांचा लंच ब्रेक होतो. यानंतर पुन्हा दुसरे सत्र २ तासांचे असते. त्यानंतर २० मिनिटांचा टी ब्रेक होतो.


रणजी ट्रॉफीत आधीच झालेला प्रयोग
सामान्यतः भारतातील कसोटी सामने सकाळी ९.३० वाजता सुरू होतात. ४० मिनिटांचा लंच ब्रेक (११.३० ते १२.१०) आणि २० मिनिटांचा टी ब्रेक (२.१० ते २.३०) असा असतो. तिसरे सत्र २.३० ते ४.३० चालते. दिवसाला ९० षटके पूर्ण करण्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो. याआधीही बीसीसीआयने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये सूर्यास्ताच्या वेळेनुसार सत्रांचे वेळापत्रक बदलले आहे आणि आता तोच प्रयोग आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिल्यांदाच होणार आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून