ठाण्यात 'आरक्षण लॉटरी' फुटली! कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

३३ प्रभागांत १३१ नगरसेवक निवडले जाणार!


ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना ज्या क्षणाची उत्सुकता होती, तो क्षण आज (मंगळवार, ११ नोव्हेंबर) आला. मुंबई, पुणे, नवी मुंबईसह एकूण २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आणि यासोबतच ठाण्यातील राजकीय गणिते बदलली. ठाण्याचे राम गणेश गडकरी रंगायतन हे नाट्यगृह आज राजकीय 'लॉटरी'चे केंद्र बनले होते. महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.


ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभाग असून, यातून तब्बल १३१ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या सोडतीनुसार, एकूण १३१ जागांपैकी ८४ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्या आहेत. तर, अनुसूचित जाती (SC) साठी ९ जागा, अनुसूचित जमाती (ST) साठी ३ जागा आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) साठी ३५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या सर्व जागांमध्ये एकूण ६६ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेतील ३२ प्रभाग हे चार सदस्यीय असतील, तर १ प्रभाग तीन सदस्यीय असणार आहे.


आज प्रत्यक्ष सोडत काढली गेली, ती ३० प्रवर्गासाठी. यात सर्वप्रथम अनुसूचित जातीच्या महिलांसाठीच्या ५ जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यामध्ये २२ (अ), ६ (अ), ३ (अ), ७ (अ), आणि २४ (अ) या प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या २ जागांसाठी ५ (अ) आणि २ (अ) या दोन प्रभागांची चिठ्ठी निघाली. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या एकूण ३५ जागांपैकी १८ जागा महिलांसाठी ठेवल्या होत्या. त्यापैकी १ (ब), ९ (ब), १५ (ब), १६ (ब) आणि २८ (ब) या प्रभागांना थेट महिला आरक्षण पडले. उर्वरित २६ पैकी ११ जागांसाठी प्रत्यक्ष सोडत काढण्यात आली, ज्यात ६ (ब), ३ (ब), २४ (ब), १७ (अ), २९ (अ), १९ (अ), १४ (अ), १० (अ), ७ (ब), ८ (अ), आणि २६ (अ) या प्रभागांचा समावेश आहे.


या आरक्षण सोडतीमुळे आता अनेक बड्या नेत्यांना त्यांच्या 'होम पिच'वरून दुसऱ्या प्रभागात धाव घ्यावी लागणार, तर अनेक नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण