अमेरिकेच्या आडकाठीनंतरही जी-२० घोषणापत्र मंजूर

शिखर परिषदेने परंपरा मोडली


जोहान्सबर्ग : अमेरिकेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकूनही जागतिक नेत्यांनी संयुक्त घोषणापत्राला मंजुरी दिल्याचे जाहीर करत, दक्षिण आफ्रिकेने शनिवारी आपल्या जी-२० शिखर परिषदेच्या योजना पुढे नेल्या. अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला व सांगितले की, महिन्यांच्या वाटाघाटीनंतर अंतिम दस्तऐवज तयार झाला असून तो पुन्हा चर्चेसाठी खुला केला जाणार नाही. त्यावर पुन्हा वाटाघाटी होऊ शकत नाहीत. हे घोषणापत्र स्वीकारण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्न केले व गेल्या आठवड्यात तर खूपच वेगाने काम झाले, असे प्रवक्त्याने सांगितले.


अमेरिकेने जोहान्सबर्ग परिषदेत सहभागी होण्यास आधीच नकार दिला होता. अमेरिकेचा हा बहिष्कार, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय बहुसंख्य सरकार श्वेत नागरिकांसोबत भेदभाव करत असल्याच्या दाव्यांवर आधारित होता. हे आरोप दक्षिण आफ्रिकेने फेटाळले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते नाकारण्यात आले आहेत. या बहिष्कारामुळे आफ्रिकन भूमीवर प्रथमच आयोजित झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या सुरुवातीवर सावट पसरले होते.


सामान्यतः जी-२० चे घोषणापत्र बैठकीच्या शेवटी पारित केले जाते. या वेळी परंपरा मोडत शिखर परिषद सुरू होताच घोषणापत्र एकमताने स्वीकारण्यात आले. यजमान देशाचा विकसनशील राष्ट्रांना हवामान संबंधित आपत्तींशी जुळवून घेण्यास मदत करणे, स्वच्छ ऊर्जेचा विस्तार करणे आणि कर्जाचा खर्च कमी करणे यावरचा भर ट्रम्प यांनी नाकारला होता.


अनेक जागतिक नेत्यांशी सुसंवाद
दक्षिण आफ्रिकेतील जी-२० शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी संभाषणादरम्यान मनमोकळेपणाने हसताना दिसल्या. जोहान्सबर्गमध्ये जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतच्या हलक्या-फुलक्या गप्पांमधून लक्ष वेधून घेतले. दोन्ही नेते एकमेकांना शुभेच्छा देताना एका सहज व मनमोकळ्या क्षणी दिसले. या शिखर परिषदेदरम्यान मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना आपुलकीने मिठी मारतानाही दिसले.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका