वरळीतील आत्महत्या प्रकरण: पतीचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या, गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला.


गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गौरी पालवे केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ती रुग्णालयात होती आणि नंतर घरी आली. यानंतर संध्याकाळी तिने हे धक्कादायक पाऊल उचलले.


सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. परंतु गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने गौरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर रविवारी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांनी अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे याचा आरोप आहे.


कुटुंबीयांच्या मते, सासरच्या मंडळींकडून सतत छळ होत होता. तसेच गौरीने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग पकडल्याचेही समोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पालवे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.


गौरी पालवे गर्जेने आपला जीव दिला नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.


सध्या अनंत गर्जे कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. पोलिस आता या प्रकरणात अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध पुढील कारवाई काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

BMC Education Department : महापालिका शिक्षण विभागातील काहींची मक्तेदारी आणि भ्रष्टाचार भाजप मोडित काढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात काही व्यक्तींचे साटेलोटे असून त्यांच्या

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांमधील रुग्णांच्या ताटात बासमती भात, स्वस्त दरातील भाजीपाला,कडधान्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह प्रसुतीगृहांमध्ये आंतररुग्णांना दोन्ही वेळचे

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग नाही; वकिलाचा दावा, 11 आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई

Mumbai Crime News: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा

Mumbai Crime News: '15 लाख दे, तरच...!', तक्रारदाराकडे मागितले पैसे; लाच घेताना आयकर निरीक्षकाला अटक

Mumbai Crime News: बेनामी मालमत्तेशी संबंधित विभागीय कारवाई बंद करण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना आता हवामानात बदल झाला आहे.

Vidhan Parishad Election Result : पुणे, अमरावतीत महायुतीची बाजी, नागपुरात उलटफेर

- काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी; उबाठाचा मात्र सुफडा साफ, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर