आता भारत व युरोप यांच्यात युपीआयसह व्यवहार शक्य? आरबीआयकडून मोठी माहिती समोर

प्रतिनिधी:आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आरबीआय केवळ भारतात नाही तर परदेशातही युपीआय (Unified Payment Interface UPI) माध्यमातून व्यवहार सुरळित, सुरक्षित, सोपे, सुकर व्हावे यासाठी परकीय देशातील वित्तीय प्रणालींशी सहकार्य करत नव्या इंटरलिंकेजसाठी कार्यरत आहे असे आरबीआयने म्हटले आहे. माहितीनुसार, आरबीआय (Reserve Bank of India), व एनपीसीआय (National Payments Corporation of India NPCI) यांच्या आसपासातील सहकार्यासह युरोपियन सेंट्रल बँकेशी सहकार्य करत एकत्रित युपीआय कनेक्ट करण्यासाठी मोठ्या पातळीवर बोलणी करत आहे. टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट (TIPS) प्रणालीतून हे भविष्यात शक्य होऊ शकते.


खासकरून युरोपियन प्रदेशातील नागरिक व भारतातील नागरिक यांच्या वाढत्या प्रतिनिधित्वातून वाढलेला व्यवहार पाहता परदेशी युपीआय सुरु झाल्यास मोठ्या प्रमाणात व्यापारांसह ग्राहकांना दिलासा मिळेल यासाठी आरबीआय प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता पैसे पाठवण्याची सु़विधा सुकर होऊ शकते.


याविषयी बोलताना आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की,'युरोसिस्टमद्वारे चालवल्या जाणाऱ्या इन्स्टंट पेमेंट सिस्टम, टार्गेट इन्स्टंट पेमेंट सेटलमेंट (TIPS) शी UPI ला जोडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) युरोपियन सेंट्रल बँकेशी संपर्क साधत आहेत. रचनात्मक आणि शाश्वत सहभागानंतर, दोन्ही बाजूंनी UPI-TIPS लिंकसाठी अंमलबजावणीचा टप्पा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.प्रस्तावित UPI-TIPS इंटरलिंकेजचा उद्देश भारत आणि युरो क्षेत्रामधील सीमापार रेमिटन्स सुलभ करणे आहे आणि दोन्ही अधिकारक्षेत्रांच्या वापरकर्त्यांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.


तांत्रिक एकात्मता, जोखीम व्यवस्थापन आणि सेटलमेंट व्यवस्था यासह UPI-TIPS लिंक कार्यान्वित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NIPL युरोपियन सेंट्रल बँकेशी जवळून सहकार्य करत राहतील.'

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण