चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला ‘मदर मेरी’चे वस्त्र; धार्मिक भावनांना धक्का, पुजारी दोन दिवस पोलिस कोठडीत

मुंबई : मुंबईच्या चेंबूर परिसरात एका मंदिरात घडलेल्या विचित्र घटनेने मोठा धार्मिक वाद निर्माण केला आहे. वाशी नाका भागातील काली मातेच्या मूर्तीला ‘मदर मेरी’ प्रमाणे पोशाख घालण्यात आल्यानंतर हिंदू संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मूर्तीवरील पोशाख बदलाचा हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मंदिरातील पुजारीला तातडीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील पुजारी रमेश याने स्वतःच काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीसारखा पोशाख परिधान केला होता. मूर्तीचे संपूर्ण रूपच वेगळ्या धार्मिक प्रतिकासारखे दिसत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. चौकशीत पुजाऱ्याने दावा केला की, “देवीने स्वप्नात येऊन मदर मेरीचा पोशाख घालण्यास सांगितले.” मात्र हिंदू संघटनांनी हा दावा तात्काळ फेटाळून लावत, हा जाणीवपूर्वक केला गेलेला अवमान असल्याचे सांगितले.


वाद वाढताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुजारी रमेशला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात या कृतीमागे काही मिशनरी लोकांनी प्रलोभन अथवा आर्थिक मदत दिल्याचा आरोपही समोर आला असून, त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे.


घटनेनंतर बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. संघटनांनी मंदिर परिसरात आंदोलन करून, प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे चेंबूर परिसरात धार्मिक वातावरण तापले असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील आरएमसी प्लांटवरील कारवाई मोहिमेला महापौरांच्या वॉर्डापासून सुरुवात; महापालिकेच्या एन विभागातील ७ प्लांटना नोटीस, कठोर कारवाईचा इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणाच्या

PM VGSY: ग्रामीण विकासाला नवी दिशा! ‘प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजनेला’ मंजुरी; 7,395 कोटींची भरीव तरतूद

नवी दिल्ली: ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, सुशासन आणि विकास नियोजन अधिक प्रभावी

इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त? IAEA प्रमुखांच्या एका विधानामुळे उडाली खळबळ!

आल्बनी: अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक

महाराष्ट्राची लोकसंस्कृती वर्षभर जपण्यासाठी ‘बाप्पाचा कट्टा’ सुरू; मुंबई-पुण्यात उद्यापासून ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सव!

मुंबई:

गोदावरी प्रदूषण नियंत्रण; क्रोमियम कंपन्यांवर कारवाईचे आदेश आणि आयुक्तांच्या महत्त्वाच्या सूचना

[caption id="attachment_1070157" align="aligncenter" width="800"] नाशिकमधील गोदावरी नदीचे प्रदूषण रोखून नदीत पर्यावरणपूरक जलप्रवाह कायम राखण्यासाठी

नाशिक ग्रामीण भागात 30 आणि 31 ऑक्टोबरला 'नो ड्रोन' अन् 'पॅराग्लायडिंग झोन'; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा भाग म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस