पिण्याचे पाणी येत नाही तरीही पाठवले बील

टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी परिसरातील प्रकार


कल्याण  : टिटवाळा इंदिरा नगर, स्मशानभूमी रस्ता परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नाही. तरीदेखील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नियमित पाण्याचे बिल पाठवत आहे. हे पाण्याचे बिल तत्काळ रद्द करावे अशी मागणी संघर्ष रहिवासी संघटनेचे अध्यक्ष गणेश भाटे यांनी 'अ' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. इंदिरा नगर परिसरात मोठी लोकवस्ती असून गेली अनेक वर्षे येथे नागरिक राहतात. येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून यापैकी मुख्य समस्या म्हणजे पिण्याच्या पाणी.


गेली कित्येक वर्षे जलवाहिनी नसतानादेखील कडोंमपाच्या वतीने पाण्याचे बिल पाठवले जात आहे. आता महापालिकेने याठिकाणी जलवाहिनी टाकली आहे. मात्र नळ जोडणीच दिली नाही. असे असतानादेखील पाणी बिल मात्र नियमितरीत्या येत आहे. याबाबत पालिकेला वारंवार सुचित करूनदेखील पालिका पाणी बिल पाठवत आहे. येथील नागरिकांना टिटवाळा स्टेशन येथून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. याबाबत संघर्ष रहिवासी संघटना इंदिरानगरचे अध्यक्ष गणेश भाटे यांचा पाठपुरावा सुरू असून सर्व पाणी बिल रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर संबंधित सहाय्यक आयुक्तांनी लवकरच सर्व्हे करू असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Thane Fire News : ठाणे हादरले! दिवा-शिल रोडवरील व्यावसायिक संकुलात भीषण आग; चार गोदामे जळून खाक, मोठी जीवितहानी टळली

ठाणे : ठाण्यातील दिवा-शिल रोड परिसरामध्ये गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि खळबळजनक आगीची घटना घडली. एका

Thane Water Cut: पुण्यानंतर आता ठाण्यातही पाणीकपात, 24 तास राहणार पाणी पुरवठा बंद; कोणत्या परिसराला बसेल फटका?

ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. MIDC मार्फत महापालिका क्षेत्रात होणार्‍या परिसरात पाणी पुरवठा बंद

ठाणे जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार, स्मारक उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे अण्णा बनसोडे यांचे निर्देश...

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर

रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाणेकरांशी संवाद साधणार, महा मेट्रोचे संचालक मुलाखतीतून देणार उत्तर

ठाणे: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ठाणेकरांच्या मनामध्ये असलेल्या

Kalyan Traffic: नवरात्रीनिमित्त अवजड वाहनांना कल्याणमध्ये निर्बंध, 7 मार्गांवर असणार प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: कल्याण शहरामध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. दुर्गाडी

सोशल मीडियावर बनावट अकाउंटवरून मुलींना अश्लील मेसेज; आरोपी मंगेश तांबेला कठोर शिक्षा व ६० हजारांचा दंड

सोशल मीडियाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग व मानसिक छळ