Vasant Smruti Awards : वसंतस्मृती पुरस्कार सोहळ्यात 159 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा गौरव; रहेजा गार्डनमधील आगीवेळी बचावकार्य करणाऱ्या जवानांचाही सन्मान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

ठाणे : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ठाण्यात आयोजित नवव्या वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात कोकण विभागातील 159 शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये 125 शिक्षक, 9 शिक्षण संस्थाचालक आणि 25 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यंदा दिवाळीत रहेजा गार्डन परिसरात लागलेल्या आगीच्या घटनांवेळी तत्परतेने बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचाही विशेष सन्मान करण्यात आला.


लोकनेते स्वर्गीय वसंतरावजी डावखरे यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.



शिक्षकांसह शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांचा सन्मान


या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार माधवी नाईक, नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे, भाजप शिक्षक प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारी सुनील लोढा, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात विचार, मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्वांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वसंतस्मृती पुरस्कार सोहळा आयोजित केला जात असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.



अग्निशमन दलाच्या जवानांचाही विशेष गौरव


दिवाळीच्या काळात रहेजा गार्डन परिसरात आगीच्या घटना घडल्या होत्या. या वेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला.



वसंतरावजींनी दाखवलेला विश्वास जपणार


भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वसंतरावजी डावखरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. वसंतरावजींनी निरंजन डावखरे यांची जबाबदारी आपल्यावर विश्वासाने सोपवली होती. तेव्हापासून आपण निरंजन यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. वसंतरावजींनी दाखवलेला विश्वास आणि त्यांच्याशी असलेले नाते जपण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्थाचालक या सर्वांचे योगदान शैक्षणिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे असल्याचे सुनील लोढा यांनी नमूद केले.



नऊ वर्षांत 1,125 हून अधिक शिक्षकांचा सन्मान


वसंतस्मृती पुरस्कार सोहळ्याचे यंदा नववे वर्ष होते. गेल्या 9 वर्षांत या उपक्रमातून 1,125 हून अधिक शिक्षक, 40 हून अधिक शिक्षण संस्थाचालक आणि 50 हून अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.


कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांतून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. निवड समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. त्यानंतर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांच्या योगदानाची दखल घेणारा हा उपक्रम त्यांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ ठरत आहे.



Comments
Add Comment

उत्तर प्रदेशात शिवसेनेची 35 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी, भाजपसोबत युती करण्याचे प्रयत्न

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील

ऐकावं ते नवलंच ! चक्क हाडांपासून बनवले कानातले, पुढे नेकलेसही बनवणार ; महिलेची अनोखी कल्पना पाहून नेटकरी थक्क

दागिने म्हटलं की सोनं, चांदी, हिरे आणि मोती हेच डोळ्यांसमोर येतात. पण एखाद्याने स्वतःच्याच शरीरातील हाडांपासून

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा

Shahid Kapoor : शाहिद कपूरने खरेदी केली नवी Land Rover Defender OCTA कार; किंमत 3 कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या लक्झरी कारच्या खरेदीमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच Land Rover

BHEL Recruitment: इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची संधी! BHEL मध्ये 200 पदांची भरती

इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी