Bhiwandi News : धक्कादायक! शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा; लहान मुलांचाही समावेश, रुग्णालयात उपचार सुरू

बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ठाणे : भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्वांना तातडीने भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.






शोरमा खाल्ल्यानंतर उलटी आणि जुलाबाचा त्रास


प्राथमिक माहितीनुसार, वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून काही नागरिकांनी शोरमा खाल्ला होता. त्यानंतर रात्रीपासून अनेकांना उलटी, जुलाब, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. सुरुवातीला एकाच कुटुंबातील 4 ते 5 जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्याकडून इतर नागरिकांनीही त्याच दुकानातून शोरमा खाल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासन सतर्क झाले.



लहान मुले आणि महिलांचाही समावेश


उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांमध्ये महिलांची आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 12 ते 13 रुग्ण उपचारासाठी आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामध्ये 4 ते 5 महिला, 5 ते 6 लहान मुले आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.



अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाई होणार?


राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी विविध ठिकाणी मोहिमा राबवल्या जात आहेत. काही आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.


अशा परिस्थितीत भिवंडीतील ही घटना समोर आल्याने खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित दुकानातील खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार का आणि दोष आढळल्यास प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. शोरमामुळेच विषबाधा झाली का, हे तपासानंतर स्पष्ट होईल.



Comments
Add Comment

Fairness Cream : 'या' क्रीमचा भयंकर साईड इफेक्ट! क्रीममध्ये सापडला पारा, 17 वर्षांच्या मुलीची किडनी धोक्यात

केरळ : गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी सोशल मीडियावरील जाहिरातींना भुलून फेअरनेस क्रीम वापरणे किती धोकादायक ठरू

Nashik : नाशिक तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होणार ? छगन भुजबळांच्या आदेशानंतर प्रशासनाचा शासनाकडे प्रस्ताव

नाशिक : नाशिक तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा मिळावा, तसेच

किहीम जमीन घोटाळ्यापासून गोकुळच्या कोट्यवधींच्या खर्चापर्यंत; नवनाथ बन यांचे संजय राऊत आणि सतेज पाटलांवर गंभीर आरोप

भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत अलिबाग येथील किहीम गावातील जमीन

Jensen Huang: एनव्हिडियाचे CEO जेन्सन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासे; बोर्डासमोर दिलगिरीनंतर पुन्हा पदभार

जगातील आघाडीची टेक कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग सध्या त्यांच्या तंत्रज्ञान किंवा एआय चिप्समुळे नाही,

Shivaji University Recruitment 2026 : शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी! शिववाणी कम्युनिटी रेडिओसाठी थेट मुलाखती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या ‘पद्मश्री ग. गो.

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या बंगळुरू कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकांनाही लक्ष्य करण्याचा इशारा

कर्नाटक येथील हुबळी-धारवाड महानगरपालिकेला मंगळवारी (२४ नोव्हेंबर) एक ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये २९ नोव्हेंबर