धोनीच्या घरी टीम इंडियाची पार्टी; पण गौतम गंभीरची गैरहजेरी

रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या २-० अशा पराभवानंतर भारतीय संघ आता वनडे सामन्यांसाठी रांचीमध्ये दाखल झाला आहे. रांचीत ३० नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडिया हॉटेलवर पोहोचली असली, तरी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मात्र अद्याप आलेला नाही. गंभीर अनुपस्थित असतानाच भारतीय खेळाडू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फार्महाऊसला भेट देण्यासाठी गेले.


रांचीमध्ये धोनीच्या फार्महाऊसवर भारतीय खेळाडूंसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह बहुतेक वरिष्ठ खेळाडूंनी धोनीची भेट घेतली असून टीमचा कोच गंभीर मात्र या वेळी गैरहजर होता.


धोनी आणि गंभीर यांच्यातील जुन्या वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे. याआधी २०११ च्या विश्वविजयानंतर गंभीरने अनेकदा अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेमुळे दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा वारंवार झाली. ‘वर्ल्ड कप केवळ एका सिक्समुळे नव्हे, तर संपूर्ण संघाच्या कामगिरीमुळे जिंकला’ असे गंभीरचे मत त्या काळात चर्चेत आले होते.


दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज हरल्यानंतर गंभीरवर चाहत्यांचा रोष वाढला आहे. गुवाहाटीतील पराभवानंतर स्टेडियममध्ये गंभीरविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्याला पदावरून दूर करावे, अशी मागणीही झाली. या प्रतिक्रियांबाबत विचारले असता, आपल्या पदाबाबतचा निर्णय बीसीसीआय घेईल, मी टीमपेक्षा मोठा नाही, असे गंभीरने सांगितले. तसेच आपल्या कार्यकाळात भारताने इंग्लंड सीरिज २-२ अशी बरोबरीत सोडवली, तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकले, हेही त्याने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात