एमएमसीचा प्रवक्ता विकास नागपुरे उर्फ ​​अनंत आणि ११ नक्षलवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण, नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

गोंदिया: महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून नक्षल संघटनेमधून आत्मसमर्पणाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नक्षलवादी संघटनेच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) चा विशेष विभागीय समिती सदस्य आणि प्रवक्ता विकास नागपुरे ऊर्फ अनंतसह ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) गोंदिया पोलिसांसमोर या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र शासनाचे एकूण ८९ लाख रुपयांचे बक्षीस होते.


महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ अर्थात 'एमएमसी' या नक्षलवादी संघटनेचा प्रवक्ता अनंतने २७ नोव्हेंबरला प्रसिद्धी पत्रक जारी करत १ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण समिती आत्मसमर्पण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी अनंतसह ११ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शरणागती पत्करली. नक्षलवादाविरोधात हे खूप मोठे यश मानावे लागेल.


प्रसिद्धी पत्रकात अनंत याने सांगितले की, समितीतील इतर सदस्यांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी १ जानेवारी २०२६ पर्यंत वेळ हवा आहे. भूपती आणि चंद्रन्ना यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याने आत्मसमर्पणाशिवाय पर्याय शिल्लक नाही. १ जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शस्त्रे खाली ठेवण्यात येतील. तसेच, या काळात कोणतीही हिंसा किंवा पीएलजीए सप्ताह पाळला जाणार नाही, असे आश्वासनही त्याने दिले.


नक्षलवादी संघटनेत दंडकारण्य आणि एमएमसी समितीचे मोठे महत्त्व आहे. एमएमसीमधील भूपती आणि चंद्रन्ना या मोठ्या नेत्यांनी शस्त्रे खाली ठेवल्यामुळे हळूहळू सर्वजण आत्मसमर्पणाकडे वळले आहे. त्यात ११ माओवाद्यांचे एकत्रिक आत्मसमर्पण आणि अनंतने सांगितलेले संपूर्ण एमएमसी संघटनेची लवकरच होणारी शरणागती हे नक्षलवाद समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.


Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी