Yugendra Pawar Marriage युगेंद्र पवार यांचा आज विवाहसोहळा; अजित पवार येणार का? उत्सुकता शिगेला

Yugendra Pawar Marriage : पवार कुटुंबातील महत्त्वाचा समारंभ आज पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज ३० नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. पवार कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांत नेहमी एकत्र येण्याची परंपरा कायम आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राजकीय घडामोडींनी गती घेतल्याने अजित पवार यांचा आजचा दिवस अतिशय व्यस्त असणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा प्रचार दौरा पूर्वनियोजित असल्याने सकाळी १० वाजता भोर येथील सभेपासून त्यांच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामती येथे त्यांच्या सभा होणार आहेत. बारामतीतील सभा सायंकाळी साडेसहा वाजता, तर युगेंद्र पवार यांच्या विवाहाची वेळ सायंकाळी ५.१५ अशी जाहीर आहे. त्यामुळे अजित पवार प्रत्यक्ष हजर राहू शकतील का, याबाबत संभ्रम कायम आहे.


विवाहाच्या पूर्वसंध्येला जय पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी लग्नपूर्व कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. खासदार सुप्रिया सुळे यांनी हळदी समारंभातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले असून त्या युगेंद्र पवारांना हळद लावताना दिसत आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पवार आज जामखेडमध्ये दिवसभर प्रचारात व्यस्त असणार असल्याने तेही विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत, मात्र त्यांनी हळद कार्यक्रमात हजेरी लावली होती.पवार कुटुंबाचे राज्याच्या राजकारणातील स्थान विशेष आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया सुळे आणि अजित पवार आजही राजकीय परंपरा पुढे नेत आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतून अजित पवारांविरोधात उमेदवारी दिली होती, परंतु अजित पवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.


सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार वेग घेत आहे. त्यामुळे अजित पवार हे दिवसातील बहुतांश कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतील. प्राथमिक माहितीनुसार ते विवाहसमारंभाच्या वेळी उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु रात्री उशिरा ते विवाहस्थळी पोहोचू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार अखेर पुतण्याच्या विवाहाला हजेरी लावतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या