मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. प्रतीक्षा भोसले असे मृत विवाहितेचे नाव असून, तिला पहिली मुलगी आहे. मात्र मुलगा हवा म्हणून तिच्यावर सासरकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणात पतीसह चार जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार राजेश्वर वानखेडे यांनी सांगितले की, मुलगी प्रतीक्षाचा विवाह २०२३ मध्ये लक्ष्मण भोसले याच्याशी झाला होता. लग्नावेळी साडेचार लाख रुपये हुंडा दिला होता. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर पती लक्ष्मण भोसले दारूच्या नशेत प्रतिक्षाला मारहाण करू लागला.नणंद माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख ह्या फोनवरून शिवीगाळ करून प्रतिक्षाल सतावत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.


प्रतिक्षाला पहिली मुलगी झाल्यानंतर छळ आणखी वाढला. मुलगा हवा म्हणून तिच्यावर ओरड, शिवीगाळ आणि पैशांची मागणी केली जात होती. स्कूल व्हॅन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात आला. प्रतीक्षेच्या कुटुंबाने ५० हजार रुपये दिले, परंतु तरीही त्रास थांबला नाही. दरम्यान, प्रतीक्षा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली असताना झालेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तरीही सासरकडच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही.


सततच्या छळाला कंटाळून प्रतीक्षाने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर लहान मुलीच्या डोक्यावर आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी पती लक्ष्मण शंकरराव भोसले आणि नणंदा माधुरी, दीपाली व भाग्यश्री देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, अमरावतीत महायुतीची बाजी, नागपुरात उलटफेर

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाचा

Vidhan Parishad Election Result : नागपूर, अमरावती, पुण्यावर महायुतीचा झेंडा! विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, उबाठाचा सुफडा साफ

भाजप २, शिवसेना १, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या

Pune News: पुण्यात महात्मा फुले स्मारकासाठी 230 कोटींचा प्रस्ताव मान्य, मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय

पुणे: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी 230

MahaDBT 2.0: मच्छीमारांना आता घरबसल्या अर्ज करता येणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत 24 योजनांचा शुभारंभ

मुंबई: राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ

जय पवार यांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित

Ahilyanagar News: कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दोन गायींची सुटका; पोलिसांची धडक कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर: तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेप्ती नाका कल्याण रोड परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत