भारतात रे-बॅन मेटा (जेन २) स्मार्टग्लास लाँच व्हिडिओ कॅप्‍चरसह इतर फिचर्स उपलब्ध लवकरच चष्म्यातून युपीआय व्यवहार शक्य होणार

मुंबई: आजपासून भारतात रे-बॅन मेटा (Gen 2) एआय ग्‍लासेस् उपलब्‍ध असणार आहेत. ज्‍यामध्‍ये व्हिडिओ कॅप्‍चर क्षमता, सुधारित बॅटरी लाइफ, अपग्रेडेड मेटा एआयचा समावेश असेल असे कंपनीने स्पष्ट केले होते. हे कलेक्‍शन देशभरात Ray-Ban India वर आणि आघाडीच्‍या ऑप्टिकल व आयवेअर रिटेलर्सकडे उपलब्‍ध असेल असे कंपनीने म्हटले आहे उपलब्ध माहितीनुसार या ग्लासची किंमत ३९९०० रूपयांपासून सुरू होते.


दैनंदिन जीवनशैलीसाठी नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय ग्‍लासेस -


कंपनीने स्मार्ट ग्लासेसबाबत स्पष्ट करताना सांगितलेले फिचर्स पुढीलप्रमाणे -


फर्स्‍ट-जनरेशन रे-बॅन मेटा ग्‍लासेसना मिळालेल्‍या यशाच्‍या आधारावर रे-बॅन मेटा (जेन २) शार्पर ३के अल्‍ट्रा एचडी व्हिडिओ कॅप्‍चर, अल्‍ट्रावाइड एचडीआर आणि अपग्रेडेड मेटा एआय


जवळपास ८ तासापर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी


२० मिनिटांमध्‍ये जवळपास ५०% फास्‍ट चार्जिंग आणि अतिरिक्‍त ४८ तास पॉवर देणाऱ्या चार्जिंग केससह रे-बॅन मेटा (जेन २) डिझाइन करण्‍यात आले आहे.


हायपरलॅप्‍से व स्‍लो मोशन यांसारखे नवीन कॅप्‍चर मोड्स नंतर सॉफ्टवेअर अपडेट्सच्‍या माध्‍यमातून सादर करण्‍यात येतील असे कंपनीने म्हटले.


नवीन स्‍टाइल्‍स, रंग आणि लिमिटेड एडिशन्‍स -


रे-बॅन मेटा जेन २ दिग्‍गज वेफेरर, आधुनिक स्‍कायलर आणि लोकप्रिय हेडलाइनर स्‍टाइल्‍समध्‍ये लाँच


शाइनी कॉस्मिक ब्‍ल्‍यू, शाइनी मिस्टिक व्‍हायोलेट आणि शाइनी अँस्‍टेरॉईड ग्रे रंगात उपलब्ध


स्मार्ट मेटा एआय


युजर 'हाय मेटा' म्‍हणत त्‍वरित उत्तरे, शिफारशी किंवा क्रिएटिव्‍ह प्रॉम्‍प्‍ट्स मिळवू शकतात.


कन्‍वर्जन फोकस लाऊड सेटिंग्‍जमध्‍ये आवाज वाढवतो


रे-बॅन मेटा (जेन २)मध्‍ये आता संपूर्ण हिंदीमध्‍ये परस्‍परसंवाद करण्‍याचा सपोर्ट उपलब्ध त्यामुळे प्रश्‍न विचारणे, फोटो व व्हिडिओ कॅप्‍चर करणे, मीडियावर नियंत्रण ठेवणे आणि संदेशांना प्रतिक्रिया देणे अशा टास्‍क्‍ससाठी मेटा एआयसोबत प्रादेशिक भाषांमध्‍ये संवाद साधू शकतात.


मेटा एआयमध्‍ये सेलिब्रिटी एआय वॉईस समाविष्ट-


नुकतेच, मेटा एआयने सेलिब्रिटी एआय वॉईस सादर केले. या फिचर्स अंतर्गत युजर विविध प्रादेशिक भाषांमधील सहाय्यतेसह परस्‍परसंवाद करू शकतात. या व्यक्तींशी संवाद साधू शकतात. उदाहरणार्थ आता युजर दीपिका पदुकोणच्‍या एआय वॉईसशी संवाद साधू शकतात.


या सहाय्यतेसाठी मेटा एआयच्‍या वॉईसेसच्‍या जागतिक लाइनअपमध्‍ये सामील होणार


यूपीआय-लाइट पेमेंट्सची चाचणी -


लवकरच या अंतर्गत डिजिटल पेमेंट देखील करता येणार आहेण असा दावा कंपनीने केला.


रे-बॅन मेटा (जेन २) ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून सुरक्षितपणे यूपीआर क्‍यूआर-कोड पेमेंट्स करण्‍याची सुविधा उपलब्ध होणार


यासाठी कसे युपीआय व्यवहार कराल?


ग्‍लासेस् परिधान करून क्‍यूआर कोडकडे पहा आणि म्‍हणा 'हाय मेटा, स्‍कॅन अँड पे', ज्‍यासह यूपीआय लाइट पेमेंट पूर्ण होईल आणि तुमच्‍या स्‍मार्टफोनचा वापर करण्‍याची गरज भासणार नाही असे कंपनीने म्हटले.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्‍या व्‍हॉट्सअँपशी लिंक असलेल्‍या बँक खात्‍यामधून पेमेंटची प्रक्रिया होणार आहे ज्‍यासह दैनंदिन व्‍यवहार जलद आणि अधिक सुलभपणे होतील असा दावा कंपनीने केला.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण