IndiGo Airlines Crisis: सरकार अ‍ॅक्शन मोडवर ! डीजीसीएकडून सीईओ पीटर इलिबर्स यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स

मुंबई: इंडिगो एअरलाईन्स (Interglobe Aviation Limited) कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना सरकारने चौकशीसाठी तत्काळ समन्स बजावले आहे. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation DGCA) विभागाने ११ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्सने एक दिवसाची मुदतवाढ मागितली होती मात्र सरकारने ती नाकारत चौकशीचे आदेश देतानाही संपूर्ण माहिती अहवालासह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात विमान प्रवाशांचे हाल झाल्यानंतर सरकार अँक्शन मोडवर आले आहे. २००० पेक्षाही अधिक विमाने रद्द झाल्यावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली. घटलेल्या विमानांमुळे कंपनीने ३००० ते ६० ते ८० हजार रूपयांपर्यंत तिकिटाचे दर सरकारने ताकीद देऊनसुद्धा वाढवले होते या प्रकरणीही कंपनीची कसून चौकशी केली जाऊ शकते. डीजीसीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे की एअरलाइनने प्रवाशांना पाठवल्या जाणाऱ्या रिअल-टाइम अपडेट्सचे पुरावे दाखवावेत अशी विचारणा केली आहे.


काल सीईओ पीटर इलिबर्स यांच्याकडून विमान सेवा पूर्ववत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी डीजीसीए याविषयी खरच सेवा पूर्ववत झाली आहे का यावर पडताळणी करणार आहे. इतकेच नाही तर किती उड्डाणे अजूनही विस्कळीत आहेत, किती प्रवासी अजूनही पुनर्निवासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि वृद्ध प्रवाशांसाठी, वैद्यकीय प्रकरणांमुळे आणि सोबत नसलेल्या अल्पवयीन मुलांसाठी कोणत्या प्राधान्य यंत्रणा आहेत याचे स्पष्ट चित्र डीजीसीएला हवे आहे. मनुष्यबळाची व रोस्टर गॅपशी संबंधित कारण कंपनीने दिले असले तरी अनुपालनाविषयी किती तरतूद कंंपनीने केली यावरही प्रशासन विचारू शकते.


अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की विमान कंपनीला तिच्या अंतर्गत देखरेख प्रणालीचे स्पष्टीकरण विचारले जाईल आणि तिचे नेटवर्क किती वेळात पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे याबाबत विचारणा होणार आहे.डीजीसीएने इंडिगोला सक्रिय वैमानिक आणि केबिन क्रूचची नवीन आकडेवारी तसेच येत्या काही महिन्यांसाठी त्यांची अपेक्षित भरती आणि मोठ्या प्रमाणात रद्दीकरण होऊ शकणाऱ्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) उल्लंघनांना टाळण्यासाठी अंमलात आणल्या जाणाऱ्या उपाययोजना घोषित करण्यास सांगितल्या आहेत अशी खात्रीलायक माहिती दिली जात आहे.किती प्रवाशांना पर्यायी इंडिगो फ्लाइटमध्ये हलवण्यात आले आणि किती प्रवाशांना इतर एअरलाइन्समध्ये जागा देण्यात आल्या याची माहिती एअरलाइनने द्यावी अशीही विचारणा कंपनीला चौकशीदरम्यान केली जाईल अशी माहिती पुढे येत आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला