PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता हा अपघात झाला.
काय आहे घटना?


मृत्यू झालेल्या मुलीचे नाव सुधा बिहारीलाल वर्मा (९) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव राधा राममनोज वर्मा असे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालक किरण भटू पाटील याला ताब्यात घेतले आहे. राधा आणि तिचा पती तळवडे येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. राधा गरोदर असल्याने मदतीसाठी तिच्या लहान बहीण सुधाला दोन महिन्यांपूर्वी गावावरून बोलावून घेतले होते.त्यांचा भाऊ देखील त्यांच्यासोबत राहतो आणि तोही खासगी कंपनीत नोकरी करतो.


राधाचा पती रात्रपाळी करून घरी झोपला होता,तर राधा कामावर गेली होती.दुपारी एकच्या सुमारास ती घरी परतली.तिने जेवण केले आणि कामावर परत जाण्यासाठी ती लहान बहीण सुधाला सोबत घेऊन पायी निघाली होती.दोघी बहिणी रस्ता ओलांडत असतानाच,भरधाव वेगात आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुधा गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तर, तिची गरोदर बहीण राधादेखील गंभीर जखमी झाली.तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पंकजा मुंडे ॲक्शन मोडमध्ये, अखर्चित निधीचा अहवाल तयार करण्याचे दिले निर्देश

मुंबई: राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आणि पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शहरांना मिळालेल्या निधीचा शहरनिहाय

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत ससून गोदीतील महिला मच्छीमारांना मिळणार सुरक्षा किट

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध ससून गोदी येथील महिला मच्छीमार भगिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने

लॅपटॉप लॉगआउट, सिस्टिम सुद्धा बंद; Innodata कंपनीतील 550 कर्मचाऱ्यांना नारळ

नवी दिल्ली: AI आल्यापासून IT सह अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील नोकऱ्या गेल्या आहेत. आता डेटा इंडस्ट्रीमध्ये सेवा

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा, प्रसिद्ध टिव्ही शोमध्ये बेबोनं सर्व सांगितलं

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या वडीलांच्या तब्येतीविषयी माहिती दिलेली आहे. अलीकडेच

Health Tips : सकाळी अंथरुणातून उठताच चक्कर येते? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारणं आणि उपाय

"कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?" नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंना भर पत्रकार परिदेत सवाल

मुंबई: भीमाशंकरच्या जंगलामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. या जंगलतोडीच्या व्हिडिओ आणि फोटो