नवी दिल्ली: AI आल्यापासून IT सह अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील नोकऱ्या गेल्या आहेत. आता डेटा इंडस्ट्रीमध्ये सेवा देणाऱ्या कंपन्यांमधीलही नोकरी जात असल्याची माहिती आहे. डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीत भारतातील सुमारे 550 कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. फिलिपिन्समधील कर्मचाऱ्यांमध्येही त्याच सुमारास कपात झाल्याचे सांगितले जात आहे. कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी काम सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांच्या अधिकृत लॅपटॉप आणि आयडीचे ॲक्सेसच बंद करण्यात आले. त्यानंतर HR टीमकडून खासगी ईमेलवर टर्मिनेशनचाच मेल पाठवण्यात आला आहे.
नवी दिल्ली: सौदी अरेबियातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सौदी अरेबियामध्ये मंगळवारी (27 ऑक्टोबर) सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये असलेल्या ...
डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीने केलेल्या ह्या अचानक नोकरकपातीमुळे अनेक नोकरदारांना झटकाच बसला आहे. दरम्यान, इनोडेटा कंपनीने अद्याप किती कर्मचार्यांना नारळ दिलेला आहे, याचा आकडा सार्वजनिकरित्या जाहीर केलेला नाही. कंपनीच्या HR टीमने कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक ईमेलवर टर्मिनेशनचाच मेल पाठवण्यात आला होता. ज्यात 26 ऑक्टोबर हाच शेवटचा कामाचा दिवस असल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनीकडून देण्यात आलेल्या लेटरमध्ये, संबंधित इंडस्ट्रीमध्ये काम कमी असल्यामुळे नोकर कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या नोकर कपातीचा कोणताही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कामगिरिशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Lucknow Triple Murder : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील सआदतगंज परिसरात पार्किंग आणि चौथरा बांधण्यावरून झालेल्या वादातून तिहेरी हत्याकांड घडल्याची घटना समोर आली ...
दिल्लीमध्ये असलेल्या डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली. सर्व कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरूवात केली. ज्याचे त्याचे आपआपले काम सुरू होते. लंच ब्रेकच्या आधीच संपूर्ण ऑफिसमध्ये नोकरकपातीच्या चर्चा सुरू झाल्या. ज्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. भारतासह फिलिपिन्समध्येही कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कंपनीच्या HR टीमने एका झूम मिटिंगच्या माध्यमातून नोकरदारांना काढून टाकल्याची माहिती दिली आहे, अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे नोकरदारांच्या चिंता आणखीन वाढल्या आहेत.
नवी दिल्ली : लिश्टनस्टाइनचे युवराज अलोइस (Hereditary Prince Alois) आणि त्यांच्या पत्नी राजकुमारी सोफी सध्या भारताच्या अधिकृत राज्य दौऱ्यावर (State Visit) आले आहेत. या ...
भारतातील कर्मचार्यांनी HR पोर्टल तपासून पाहिले असता, HR आणि मॅनेजमेंट टीमने त्यांची पेमेंट स्लीप सुद्धा तयार करून पाठवली होती. शिवाय, कालचा म्हणजे 26 ऑक्टोबर नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले होते. डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीमध्ये झालेल्या ह्या मोठ्या नोकरकपातीची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.